Fake PMO Officer | Kiran Patel
Fake PMO Officer | Kiran Patel  Dainik Gomantak
देश

Fake PMO Officer: 'पीएमओ'चा अधिकारी असल्याचे सांगून घेतली Z प्लस सुरक्षा; फाईव्ह स्टार हॉटेलचीही लुटली मजा, अन्...

Akshay Nirmale

PMO Fake Official Arrested: झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए या उक्तीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) उच्च अधिकारी असल्याचे भासवून एका ठगाने चक्क सरकारी सुविधांचा उपभोग घेतला आहे.

यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्यापासून ते झेड प्लस सुरक्षा मिळवल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये हा प्रकार समोर आला असून या महाठगाचे नाव आहे किरणभाई पटेल. त्याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पटेल याला झेड-प्लस सुरक्षा, बुलेटप्रूफ एसयूव्हीसह जम्मू-काश्मीरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकृत राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पटेल याने जम्मू-काश्मीरमधील उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या आणि नियंत्रण रेषेजवळील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटीही दिल्याचा आरोप आहे.

किरण पटेल याला ३ मार्च रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी अटक केली होती. आरोपीने स्वत:ची ओळख केंद्रात 'अतिरिक्त सचिव' म्हणून करून दिली होती.

गुजरातचा रहिवासी

किरण पटेल हा गुजरातचा रहिवासी आहे. आरोपीचे व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट आहे. ट्विटर प्रोफाइलनुसार, त्याने व्हर्जिनियामधील कॉमनवेल्थ विद्यापीठातून पीएचडी आणि आयआयएम त्रिचीमधून एमबीए केले आहे.

आरोपीने ट्विटरवर स्वत:ला विचारवंत, रणनीतीकार, विश्लेषक आणि प्रचार व्यवस्थापक असे म्हटले आहे. आरोपीने त्याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक मिळाल्याचे अनेक व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत.

सरकारी सुविधांचा उपभोग

श्रीनगरच्या पोलिस स्टेशनमध्ये दाखल एफआयआरनुसार, किरण पटेल याने सरकारी आदरातिथ्य, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ) आणि आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्य केले. पटेल यांच्यावर 2 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी त्याला अटक करण्यात आली.

असे पकडले

2 मार्च रोजी पटेल तिसऱ्यांदा काश्मीरमध्ये आला आणि विमानतळावर उतरला तेव्हा सीआयडी अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. कारण कोणत्याही व्हीआयपी मुव्हमेंटची माहिती अधिकाऱ्यांना नव्हती.

आरोपीला अटक केल्यानंतर आणि प्राथमिक चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या ताब्यातून बनावट ओळखपत्रे जप्त केली. पटेलकडून 10 बनावट व्हिजिटिंग कार्ड, दोन मोबाईल जप्त केले आहेत. दरम्यान, पटेल यांचे वकील रेहान गोहर यांनी दावा केला आहे की, त्यांच्या अशिलासोबत आणखी एक व्यक्ती होती. पोलिसांनी दुसर्‍या व्यक्तीला सोडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT