'काँग्रेस आजचे मोगल, नव्या भारताला मदरशांची गरज नाही', कर्नाटकमध्ये आसामच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

आजच्या भारतामध्ये पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची ताकद आहे.
CM Himanta Biswa Sarma
CM Himanta Biswa SarmaDainik Gomantak

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. सरमा यांनी कर्नाटकातील बेळगावमध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. सरमा यांनी काँग्रेसचे आजचे नवे मुघल आहेत अशा शब्दात टीका केली आहे.

मुघलांनी देश कमकुवत केला होता, आज काँग्रेस तेच करत आहे, असेही सरमा म्हणाले. राम मंदिर बांधले तरी त्यांचा आक्षेप आहे. नव्या भारताला मदरशांची गरज नाही. असे सरमा म्हणाले.

सरमा म्हणाले की, आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे अभिमानाने सांगतात की मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, पण मला त्यांच्याशी काही अडचण नाही. भारतात अशा व्यक्तीची गरज आहे, जो अभिमानाने हिंदू असल्याचे सांगू शकेल. भारत आज एक शाश्वत देश आहे. हिंदू इथे आहे आणि राहणार.

औरंगजेबाने सनातन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तो आपली सनातन संस्कृती नष्ट करू शकला नाही. औरंगजेबाने अनेक लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले आणि त्यांचे धर्मांतर केले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी दाखवून दिले की भारत माता त्यांच्यासारखा मुलगा निर्माण करू शकते जो औरंगजेबाला आव्हान देऊ शकेल. असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.

CM Himanta Biswa Sarma
Hyderabad Fire Video: हैदराबादमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, महिलेसह सहा जणांचा मृत्यू

"बांगलादेशातून लोक आसाममध्ये येतात आणि आपल्या सभ्यतेला आणि संस्कृतीला धोका निर्माण करतात. मला विचारण्यात आले की तुम्ही 600 मदरसे बंद केले आहेत. सर्व मदरसे बंद करण्याचा माझा विचार आहे कारण आम्हाला शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे हवी आहेत, मदरशांची नाही. 'न्यू इंडियाला मदरसे नको आहेत, त्यासाठी विद्यापीठे, शाळा आणि महाविद्यालये हवी आहेत." असे वक्तव्य सरमा यांनी केले.

"एकेकाळी दिल्लीचे सम्राट मंदिर पाडण्याची भाषा करायचे, पण आज नरेंद्र मोदींच्या राजवटीत आपण मंदिर बांधण्याची भाषा करतात. हा नवा भारत आहे. नव्या भारताची अर्थव्यवस्था ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मजबूत आहे. न्यू इंडिया आता स्वतः लस तयार करते. आजच्या भारतामध्ये पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची ताकद आहे. नवा भारत आपल्याला वाचवायचा आहे." असे सरमा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com