Chinese cab driver in Singapore misbehaves with woman and abuses India. Dainik Gomantak
देश

Viral Video: चीनी कॅब चालकाचा सिंगापूरमध्ये मुजोरपणा, महिलेशी गैरवर्तन करत भारताविषयी अपशब्द

Viral Video: सिंगापूर-चायनीज कॅब ड्रायव्हरनेची एक युरेशियन महिला आणि तिची मुलगी भारतीय असल्याचा समज करून वांशिक अत्याचार केल्याबद्दल चौकशी केली जात आहे.

Ashutosh Masgaunde

Chinese cab driver in Singapore misbehaves with woman and abuses India: सिंगापूरमध्ये कॅब सेवा देणारी कंपनी टाडाचा चालक आणि एक प्रवासी महिलेच्या वादाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

यात ड्रायव्हरने महिला प्रवाश्यावर वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचे दिसत आहे. जेव्हा चालकाने प्रवाशाला तिने बुक केलेल्या स्थानावर नेले. तेव्हा चुकीचा पत्ता आणि दूरच्या मार्गावरून नेल्यावरुन त्यांच्यात शाब्दिक भांडण झाले.

विशेष म्हणजे हा ड्रायव्हर चीनी असून, प्रवाशी महिला युरेशियन आहे. मात्र, ड्रायव्हरला महिला भारतीय असल्याचा समज झाला. त्यामुळे त्याने भारताबद्दल ही अपशब्द वापरले.

जॅन होडेन नावाच्या महिलेने ही बाब निदर्शनास आणून देत या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

जॅन होडेन म्हणाल्या "हा ड्रायव्हर चुकीच्या मार्गाने जात होता. त्यावेळी मी त्याला सूचना केल्या. तेव्हा त्याने उलट माझ्यावर वर्णद्वेषी टीका केली. नंतर त्याने मला भारतीय म्हटले."

व्हिडिओमध्ये तो चीनी ड्रायव्हर म्हणत होता, "तू भारतीय आहेस.. मी चिनी आहे, लोकांना माहित आहे की तू भारतीय आहेस, मी चायनीज आहे, तुम्ही भारतीय खूप सर्वात वाईट ग्राहक असता."

महिलेने यावेळी ती सिंगापूर-युरेशियन असल्याचे सांगितले. तरीही या ड्रायव्हरचा मुजोरपणा थांबला नाही.

या ड्रायव्हरने पुढे महिलेसोबत असलेल्या तिच्या 9 वर्षांच्या मुलीवरही आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या. तो म्हणाला "तुम्ही खूप बेकायदेशीर आहात. तुमच्या बाळाची उंची १.३५ मीटरपेक्षा कमी आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी वाद घालू नका."

सिंगापूरमध्ये कॅब सेवा पुरवणारी कंपनी टाडा ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कंपनीने याप्रकरणी स्पष्टीकरण देताना म्हटले की, आम्ही वर्णद्वेष, भेदभाव किंवा गैरवर्तन सहन करत नाही. आमचे पथख प्रकरणाचा तपास करत आहे. ज्या प्रवाशाने हा प्रकार समोर आणला त्यांचे आभार.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT