Chinese Fighter Jets Near India Border Dainik Gomantak
देश

Chinese Fighter Jets Near India Border: भारत-चीन द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना धक्का; सीमेवर चीनकडून लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न

China J 20 Fighter Jets: चीनने एकूण दोन तळांवर ही विमाने तैनात केली आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नवी दिल्ली: द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव सध्या चीनदौऱ्यावर असतानाच भारतीय सीमेच्या जवळील हवाई तळांवर चीनने ११ लढाऊ विमाने तैनात केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘जे-२० मायटी ड्रॅगन’ वर्गातील ११ विमाने जून आणि जुलैमध्ये तळांवर तैनात केल्याचा दावा ‘व्हॅन्टोर’ या संरक्षण क्षेत्रातील कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. या अहवालात विमाने तैनात असलेले उपग्रहांद्वारे घेतलेले छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अहवालानुसार, चीनने एकूण दोन तळांवर ही विमाने तैनात केली आहेत. चीनने नऊ जुलैला शिनजिआंग प्रांतातील उइगर स्वायत्त प्रदेशातील हाँटन या नागरी आणि लष्करी वापरासाठी असलेल्या हवाई तळावर सात ‘जे-२०’ विमाने तैनात केली. हा हवाई तळ लेहपासून ३८९ किमी अंतरावर, तर लडाखमधील दौलतबेग या भारतीय हवाई दलाच्या हवाई तळापासून केवळ २४५ किमी अंतरावर आहे.

चीनच्या कोणत्याही हवाई तळावर एवढी विमाने एकाच वेळी तैनात असल्याचे कोणत्याही व्यावसायिक उपग्रहाच्या छायाचित्रात यापूर्वी दिसले नव्हते. या अहवालात प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या छायाचित्रानुसार, तिबेटमधील दामशुंग हवाई तळावर चार ‘जे-२०’ विमाने तैनात असल्याचे दिसून आले आहे. हा हवाईतळ अरुणाचल प्रदेशमधील तवांगपासून ३४४ किमी अंतरावर आहे.

चीनने भारताच्या सीमेवर अतिउंचीवरील हवाई तळांवरील युद्धसज्जता कायमस्वरूपी वाढविली असून भारतानेही याकडे नवे वास्तव म्हणून पाहात येथील आपली क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.चिंतेची बाब ‘जे-२०’ विमानांची घातक क्षमता अधिक असल्यानेच त्यांच्या तैनातीने चिंता व्यक्त होत आहे. ही विमाने रडारवर दिसत नाहीत. भारताकडे सर्वांत आधुनिक असलेल्या ‘राफेल’मध्येही ही क्षमता नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT