Pangong Lake Dainik Gomantak
देश

चीनने पँन्गॉग लेकमध्ये आणली हाय स्पीड बोट, ड्रॅगनचा नेमका हेतू तरी काय?

चीनकडून (China) वेस्ट वॉटर फ्लीटसाठी हायस्पीड पेट्रोलिंग बोट कार्यान्वित करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि चीनमधील वाद आता काहीसा स्थिर आहे. दोन्ही देशांचे सैन्य पँन्गॉग आणि गोगरा येथूनही मागे हटले आहेत, परंतु दोन्ही देशांनी आपली तयारी सुरु ठेवली आहे. अलीकडेच, पॅगॉन्ग लेकमध्ये भारताने चिनी बोटींना प्रतित्युत्तर देण्यासाठी अत्याधुनिक आणि शक्तिशाली बोट तैनात केली आहे. त्यामुळे घाईघाईत, चीनने आपल्या वेस्टर्न थिएटर कमांडच्या वॉटर स्क्वाड्रनसाठी एक अत्याधुनिक बोटीचा समावेश केला आहे.

इंट रिपोर्टनुसार, चीनकडून वेस्ट वॉटर फ्लीटसाठी हायस्पीड पेट्रोलिंग बोट कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यात दोन प्रकारच्या बोटींचा समावेश आहे. एक म्हणजे टाइप 928 सी बोट आणि दुसरी बोट 928 डी. या बोटीचे वैशिष्ट म्हणजे ती आधीच्या बोटीपेक्षा अधिक वेगवान आहे. 928 सी बोटीचा कमाल वेग ताशी 60 किलोमीटर आहे आणि या बोटीत 25 ते 30 लोक बसू शकतात. ही बोट गस्त घालण्यासाठी आहे आणि या बोटीमध्ये एक सैनिक मशीनगनसह तैनात असणार आहे.

दुसरीकडे, दुसरी बोट 928 डी बोट, जी एक आधुनिक असॉल्ट बोट आहे, तिचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे आणि 11 सैनिकांना सामावून घेऊ शकते. बोटीमध्ये 12.7 मिमी मशीन गन आणि बोट चालवणाऱ्या सैनिकांसाठी मशीन गन पेडेस्टल्स असलेले रिमोट शस्त्र स्टेशन आहे. या बोटीद्वारे, चिनी पीएलए कोणत्याही हल्ल्याची कारवाई करु शकते. चीनने शिनजियांग मिलिटरी डिव्हिजनच्या (Xinjiang Military Division) वॉटर स्क्वाड्रनचा भाग असलेल्या पँगोंग लेकवर कब्जा केला आहे आणि वेस्टर्न थिएटर कमांडच्या वेस्ट सी फ्लीटचा आहे.

दरम्यान 200 सैनिक या वॉटर स्क्वाड्रनमध्ये तैनात आहेत, आणि 20 पेक्षा जास्त बोटी सध्या या स्क्वाड्रनचा भाग आहेत. चीनच्या या तयारीमागे हे सर्वात मोठे कारण आहे. भारतीय लष्कराच्या अनेक हायस्पीड स्टील बोटी पॅनगॉन्गमध्ये तैनात. या वर्षी जून महिन्यापासून भारताला या बोटी मिळू लागल्या ज्या पॅनगॉन्ग तलावामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. ही भारतीय बोट इतकी मजबूत आहे की, चिनी बोटीला टक्कर देऊन त्याचे नुकसान होणार नाही.

लष्कराच्या जवानांच्या जलद हालचालीसाठी भारताने एकूण 12 बोटी आणि 17 बोटी तैनात केल्या आहेत. या बोटी 134 किलोमीटर लांबीच्या पैंगॉन्ग सरोवराच्या भारतीय बाजूच्या 45 किलोमीटरपर्यंत चालतात आणि भारतीय नौका चीनच्या घुसखोरीला आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT