Madhya Pradesh High Court: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने केंद्र सरकारला मुलगा आणि मुलगी यांच्यातील संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 18 वरुन 16 वर्षे करण्याबाबत विचार करण्याची विनंती केली आहे.
न्यायालयाने म्हटले की, सध्याच्या युगात इंटरनेटमुळे मुले लवकर तरुण आणि हुशार होत आहेत. अशा स्थितीत त्यांनी उचललेली पावले कधी कधी त्यांचे भविष्य अंधकारमय करतात.
दरम्यान, उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनेक किशोर आणि नवयुवक 18 वर्षापेक्षा लहान असणाऱ्या मुलीशी संबंध ठेवतात. यानंतर पोलिसही त्यांच्याविरुद्ध पोस्को कायदा आणि बलात्कार यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवतात.
सेक्सच्या आकर्षणातून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये मुलांना दोषी मानले जाते. त्यामुळे अनेक किशोरवयीन मुले अन्यायाला बळी पडतात.
दुसरीकडे, ग्वाल्हेरच्या थाटीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या राहुल जाटववर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 जुलै 2020 रोजी राहुल जाटव याला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो तुरुंगात आहे.
राहुलचे वकील राजमणी बन्सल यांनी न्यायालयात सांगितले की, पीडित मुलीने दोन जणांवर बलात्काराचा आरोप केला होता. घटना 18 जानेवारी 2020 ची आहे. मुलगी राहुलच्या कोचिंग सेंटरमध्ये अभ्यासासाठी जात असे.
घटनेच्या दिवशी ती कोचिंग सेंटरमध्ये पोहोचली तेव्हा तिथे कोणीच नव्हते. कोचिंग डायरेक्टर राहुल जाटव यांनी तिला ज्यूस दिला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर राहुलने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तिच्याशी संबंध ठेवले.
तसेच, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन राहुल जाटव तिला सतत ब्लॅकमेल करत असे आणि त्यामधून संबंध ठेवत असे. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली.
न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये तिचा गर्भपातही झाला होता. पीडित मुलीने दूरच्या नातेवाईकावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोपही केला होता.
तर, दोन्ही लोकांच्या संमतीनेच परस्पर संबंध निर्माण झाल्याचे वकील बन्सल यांनी न्यायालयाला सांगितले. अशा स्थितीत त्यांच्या अशिलाला खोटे ठरवण्यात आले आहे. त्यांनी न्यायालयात विनंती केली होती की, त्यांचे आशील राहुल जाटव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर (FIR) रद्द करण्यात यावा.
सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने राहुल जाटव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला.
त्याचबरोबर, परस्पर संमतीने निर्माण झालेले नाते मच्युअर होण्याआधी, इंटरनेटच्या युगात किशोरवयीन मुलांचे वय पाहावे, अशी शिफारस केंद्र सरकारकडे (Central Government) केली आहे.
18 वर्षावरुन 16 वर्षे वय करण्यावर पुनर्विचार करावा, जेणेकरुन तरुणांवर अन्याय होणार नाही. दिल्लीतील निर्भया घटनेनंतर संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 16 वरुन 18 वर्षे करण्यात आले.
सहमतीपूर्ण संबंध: सहमतीपूर्ण संबंध म्हणजे कोणतेही नाते, भूतकाळ किंवा वर्तमान, जे प्रेमाचे, शारीरिकदृष्ट्या जवळचे किंवा लैंगिक स्वरुपाचे आहे आणि ज्याला दोन्ही पक्षांनी संमती दिली आहे. यामध्ये विवाहाचाही समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.