Nirbhaya Like Rape In Chhattisgarh Dainik Gomantak
देश

धक्कादायक: निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर मोडली छाती अन् घशाची हाडं

एका घराचा दरवाजा उघडा होता आणि त्या घरात एका महिलेला झोपलेली पाहून...

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात एका महिलेवर निर्भयासारखा प्रकार घडल्याचे उघडीस आले आहे. या ठिकाणी निर्भाया प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे उघडीस आले. येथे 52 वर्षीय महिलेवर प्रथम बलात्कार करण्यात आला, त्यानंतर महिलेच्या गुप्तांगात पॅनचे हँडल टाकून महिलेची छाती पायाने चिरडण्यात आली. त्यामुळे महिलेच्या छातीचे व घशाचे हाड तुटून तिचा मृत्यू झाला. (Nirbhaya Like Rape In Chhattisgarh)

3 जुलै रोजी अकलतारा नगरातील वॉर्ड क्रमांक 02 पोडीभाठा येथे भांडी साफ करणाऱ्या 52 वर्षीय महिलेचा घरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. डॉक्‍टरांनी महिलेचा शॉर्ट पीएम केला. त्यानंतर रिपोर्ट आला असता, मृत महिलेवर बलात्कार केल्याने अतिरक्तस्राव आणि घशात, छातीचे हाड फ्रॅक्चर आणि फुफ्फुस फाटल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. येथे पीएम रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अकलतारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 459, 302, 367 नुसार गुन्हा दाखल केला.

या परिसरात चोरटा सूरज भोई फिरत असल्याचे पोलिस तपासात (Police Investigation) निष्पन्न झाले. पोलिसांनी सूरज भाईचा शोध सुरू केला आणि अकलतारा येथील एका ढाब्यावर सूरजच्या भावाला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, सुरुवातीला तो नकार देत राहिला, पण कडक चौकशी केली असता सूरजने सांगितले की, 2 जुलैच्या रात्री पौरी भाटा येथे सुरज फिरत होता, तेव्हा एका घराचा दरवाजा उघडा होता आणि त्या घरात एक महिला झोपलेली होती. महिलेला एकटी पाहून घरात घुसून धमकावून तिच्यावर सुरजने बलात्कार केला. हा प्रकार घडत असताना महिलेने आरडाओरडा केला म्हणून त्याने तिची योनी भागात पॅनचे हँडल घालून हत्या केली. आरोपीला जांजगिरी चंपा येथे अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

SCROLL FOR NEXT