पॅरोलवर सुटलेला राम रहीम खरा की खोटा? ''याचिकाकर्त्यांनी फिक्शन फिल्म पाहिलीयं''

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला बनावट (डमी) ठरवणारी याचिका फेटाळून लावली.
Ram Rahim
Ram RahimDainik Gomantak
Published on
Updated on

Punjab And Haryana High Court: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी रोहतकच्या सुनारिया तुरुंगातून एका महिन्यासाठी पॅरोलवर सुटलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला बनावट (डमी) ठरवणारी याचिका फेटाळून लावली आहे. (Ram Rahim Allegedly Replaced With Dummy Punjab And Haryana High Court Dismisses Plea)

दरम्यान, राम रहीम सिंग याच्या जागी 'डमी' (बनावट) राम रहीम आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. हायकोर्टाने ही याचिका निराधार ठरवत याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.

Ram Rahim
मोठा आरोप! डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम तुरुगांत खोटा, चौकशीची मागणी

दुसरीकडे, आज या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती कर्मजीत सिंह म्हणाले की, 'हे फिक्शन नाही. उच्च न्यायालयाला (High Court) अशा प्रकरणांची सुनावणी करायची नाही.' ते पुढे म्हणाला की, 'तुम्ही फिक्शन फिल्म पाहिल्याचं दिसतंय. पॅरोलवर आलेला राम रहीम गायब कसा होऊ शकतो.' त्यांनी याचिकाकर्त्याला फटकारणारी याचिका फेटाळून लावली.

तसेच, चंदीगड, पंचकुला आणि अंबाला येथील काही तथाकथित डेरा भक्तांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात पोहोचलेला गुरमीत राम रहीम हा खरा नसून मूकबधिर आहे, अशी शंका याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केली होती. त्याचा भावही खऱ्या गुरमीत राम रहीम सिंगसारखा नाही.

Ram Rahim
'या' कारणासाठी गुरमीत राम रहीम तुरूंगातून बाहेर...

त्याचवेळी, डेरा सच्चा सौदा व्यवस्थापनाने हे भक्तांची दिशाभूल करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रवक्ते जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) म्हणाले की, 'याचिका दाखल करणारे डेराचे अनुयायी नाहीत. डेराच्या अनुयायांची गुरुजींवर पूर्ण श्रद्धा आहे. हा सगळा खोडसाळपणाचा कट आहे. याची प्रशासनाने चौकशी करावी.'

Ram Rahim
Ram Mandir: अयोध्येत आज होणार राम मंदिराच्या गर्भगृहाची पायाभरणी

शिवाय, डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले. ते उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरनावा आश्रमात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, 'जवळपास आठ महिन्यांपूर्वीही याच लोकांनी डेरा प्रमुखाच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत याचिका दाखल केली होती.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com