Chhattisgarh High Court Dainik Gomantak
देश

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Chhattisgarh High Court: न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 375 नुसार बलात्काराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी 'पेनेट्रेशन' ही अनिवार्य अट आहे.

Manish Jadhav

Chhattisgarh High Court: छत्तीसगड उच्च न्यायालयाने 2004 मधील एका जुन्या बलात्कार प्रकरणाचा निकाल देताना कायद्यातील अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश टाकला. न्यायालयाने स्पष्ट केले की, लिंगाचा योनीमध्ये प्रवेश (Penetration) झाल्याशिवाय झालेला वीर्यपात हा तांत्रिकदृष्ट्या 'बलात्कार' मानला जाऊ शकत नाही. सोमवारी, 16 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऐतिहासिक निकाल देताना न्यायमूर्ती कुमार व्यास यांनी नमूद केले की, जरी आरोपीची कृती हिंसक लैंगिक हल्ल्याच्या स्वरुपाची असली तरी प्रत्यक्ष पेनेट्रेशनच्या अभावामुळे हा गुन्हा 'बलात्काराचा प्रयत्न' (Attempt to Rape) या श्रेणीत मोडतो.

कायद्यातील 'ती' अट

न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 375 नुसार बलात्काराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी 'पेनेट्रेशन' ही अनिवार्य अट आहे, केवळ वीर्य गळणे पुरेसे नाही. धमतरी जिल्ह्यातील वासुदेव गोंड याने 2004 मध्ये एका महिलेला फूस लावून घरी नेले आणि तिला ओलीस ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. कनिष्ठ न्यायालयाने त्याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती, ज्याविरोधात वासुदेवने उच्च न्यायालयात अपील केले होते.

वैद्यकीय पुरावे आणि विसंगती

उच्च न्यायालयाने या प्रकरणातील वैद्यकीय अहवालाचा बारकाईने अभ्यास केला. तपासणीत असे दिसून आले की, पीडितेचे कौमार्य (Virginity/Hymen) शाबूत होते. जरी डॉक्टरांना गुप्तांगावर लालसरपणा आणि कपड्यांवर मानवी शुक्राणू आढळले असले, तरी प्रत्यक्ष शरीरसंबंधाची (संभोग) पुष्टी ते करु शकले नाहीत. उलटपक्षी, पीडितेच्या साक्षीतही काही विसंगती आढळल्या. उलटतपासणी दरम्यान, तिने केवळ 'अंशतः पेनेट्रेशनची शक्यता' मान्य केली, जी कायद्याच्या दृष्टीने संशयास्पद ठरली. कायद्यानुसार, बलात्काराचा गुन्हा पूर्ण होण्यासाठी लिंगाचे योनीमध्ये पेनेट्रेशन होणे अनिवार्य असते, भलेही तो कितीही अल्प का असेना.

शिक्षेत मोठी कपात

या पुराव्यांच्या आधारे, उच्च न्यायालयाने हा गुन्हा कलम 376 (बलात्कार) ऐवजी कलम 376 सह कलम 511 (बलात्काराचा प्रयत्न) अंतर्गत पुनर्वर्गीकृत केला. या बदलामुळे वासुदेव गोंडची शिक्षा 7 वर्षांवरुन कमी करुन 3 वर्षे 6 महिने कठोर कारावास अशी करण्यात आली. तसेच, त्याला 200 रुपये दंड ठोठावण्यात आला. एवढचं नाहीतर न्यायालयाने आरोपीने (Accused) यापूर्वी कोठडीत घालवलेले 13 महिने त्याच्या अंतिम शिक्षेतून वजा केले जातील, असेही सांगितले. न्यायालयाने या निकालाद्वारे हे अधोरेखित केले की, कायद्याची कठोर अंमलबजावणी करताना पुराव्यांची तांत्रिक अचूकता किती महत्त्वाची असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT