Chhattisgarh Dainik Gomantak
देश

Chhattisgarh Bemetara Violence: शाळकरी मुलांच्या भांडणामुळे जातीय तणाव, हिंदू संघटनांनी दिली छत्तीसगड बंदची हाक

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये शाळकरी मुलांमधील भांडणाला जातीय हिंसाचाराचे स्वरुप आले आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूप्रकरणी बेमेटरा जिल्ह्यात तणाव वाढला आहे.

Manish Jadhav

Chhattisgarh Bemetara Violence: छत्तीसगडमध्ये शाळकरी मुलांमधील भांडणाला जातीय हिंसाचाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. दरम्यान, तरुणाच्या मृत्यूप्रकरणी बेमेटरा जिल्ह्यात तणाव वाढला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या छत्तीसगड बंदचा सोमवारी चांगलाच परिणाम झाला. राज्यातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, बंदचा अत्यावश्यक सेवा आणि शाळांवर परिणाम झाला नाही.

दरम्यान, रायपूरच्या भाटागाव परिसरात काही आंदोलकांनी प्रवासी बसवर दगडफेक केली. तथापि, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंद शांततेत असून राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

रायपूर (Raipur), बेमेटारा, जगदलपूर, कोरिया इत्यादी ठिकाणी विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दलासह अनेक संघटनांनी पायी आणि दुचाकीवरुन रॅली काढली आणि लोकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

दुसरीकडे, विरोधी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पदाधिकाऱ्यांनीही रस्त्यावर उतरुन लोकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, कोरब्यासह काही शहरांमध्ये दुकाने सुरुच आहेत.

बिरनपूर गावात झालेल्या जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ विहिंपने राज्यव्यापी बंदची हाक दिली. शनिवारी झालेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला, तर तीन पोलीस जखमी झाले. बेमेटारापासून 60 किमी अंतरावर असलेल्या गावात शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणानंतर सांप्रदायिक हिंसाचार झाला.

तसेच, स्थानिक प्रशासनाने सीआरपीसीचे कलम 144 लागू केले आहे, जे चार किंवा अधिक लोकांच्या एकत्र येण्यास मनाई करते. गावात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 700 पोलीस (Police) तैनात करण्यात आले आहेत. भुवनेश्वर साहू (23) यांच्यावर रविवारी कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

काँग्रेस नेते सुशील आनंद शुक्ला म्हणाले की, भाजप आणि आरएसएसने या घटनेचे राजकारण करु नये. पोलिस आणि प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, मात्र भाजप आणि आरएसएस जातीय रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शुक्ला पुढे म्हणाले की, 'आस्थापना बंद ठेवण्यासाठी काही छोट्या दुकानदारांवर दबाव आणणे निंदनीय आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT