Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त जिल्हा दंतेवाडा येथे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी धुमाकुळ घातला आहे. दंतेवाडा येथे बस पेटवून देत आपले अस्तित्व दाखविण्याची धडपड नक्षलींनी केली आहे.या बस मध्ये २१ प्रवाशी होते. नक्षलवाद्यांनी कोणत्याही प्रवाशाला इजा केलेली नाही.
हे संपूर्ण प्रकरण दंतेवाडा जिल्ह्यातील घोटिया चौकाजवळचे आहे. हा परिसर मालेवाही आणि बोदली सीआरपीएफ कॅम्प दरम्यान आहे. 20-25 नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप आहे. प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगण्यात आले, त्यानंतर बस पेटवण्यात आली. या आगीनंतर नजीकच्या सीआरपीएफ कॅम्पना सतर्क करण्यात आले आहे.
विजापूरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
विजापूरमधील गांगलूर पोलीस ठाण्याचा परिसर नक्षलग्रस्त आहे. शनिवारी सकाळी पोलिस नक्षलविरोधी मोहिमेत कोरचोली, सावनार, तोडकाच्या दिशेने निघाले. या टीममध्ये DRG, STF आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 85 व्या बटालियनचे कर्मचारी होते. सावनारजवळील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.