Monkey, Pythons, Tortoises: What Chennai Customs Found With Passenger
Monkey, Pythons, Tortoises: What Chennai Customs Found With Passenger  ANI
देश

प्राण्यांची तस्करी करणाऱ्याला चेन्नईत अटक, कॅनडीयन अजगरांसह कॅरी केले होते...

दैनिक गोमन्तक

Animal Trafficking Case: बँकॉकहून बेकायदेशीरपणे जिवंत प्राणी घेऊन येणाऱ्या एका प्रवाशाला चेन्नई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अडवले, चेकिंग करतांना प्रवाशाच्या सामानामध्ये संशयीत वस्तू असल्याची शंका आल्याने अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली त्या दरम्यान हा प्रकार उघडीस आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना एका पुरुष प्रवाशाबद्दल गुप्तचर माहिती मिळाली आहे जो फ्लाइट क्रमांक TG-337 वर जिवंत प्राण्यांसह बँकॉकहून येत होता.

कस्टम अधिकार्‍यांनी त्या प्रवाशाला थांबवले आणि त्याच्याकडून एक डी ब्राझा माकड, 15 किंग साप, पाच बॉल पायथन आणि दोन अल्दाब्रा कासव जप्त केले. हे जिवंत प्राणी बेकायदेशीरपणे आयात केले गेले. हे प्राणी वेगवेगळे ठेवून प्रमाणन सेवा (AQCS) यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर थाई एअरवेजद्वारे या सर्व प्राण्यांना मूळ देशात परत पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डी ब्राझाचे माकड एक मोठे प्राइमेट आहे, जे मूळचे आफ्रिकेतील आहे. त्यांचे नाव फ्रँको-इटालियन शोधक पियरे सवोर्गन डी ब्राझा यांच्या नावावरून ठेवण्यात आले. किंग स्नेक्स हे मध्यम आकाराचे साप आहेत जे आग्नेय कॅनडापासून इक्वाडोरपर्यंत आढळतात. ते बिनविषारी आहेत आणि त्यांच्या आहारात लहान सस्तन प्राणी, पक्षी, सरडे, उभयचर प्राणी इत्यादींचा समावेश होतो. तर पाळीव प्राणी म्हणून पाळलेल्यांमध्ये बॉल पायथन ही सर्वात लोकप्रिय सापांची प्रजाती आहे.

अल्दाब्रा कासव हे जगातील सर्वात मोठ्या कासवांपैकी एक आहे, त्यांचे वजन 250 किलो पर्यंत पोहोचू शकते आणि 150 वर्षांपर्यंत ते जगू शकतात. हे कासव हिंदी महासागरातील अल्दाब्रा बेटावर आढळतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT