Cheetah Pawan Dainik Gomantak
देश

Cheetah Pawan: कुनोच्या पार्कमध्ये चित्ता पवन पुन्हा मोकळ्या जंगलात, पाहा फोटो

कुनो नॅशनल पार्कच्या परिसरात बंदिस्त असलेल्या पवन या नर चित्ताला दोन महिन्यांनंतर पुन्हा मोकळ्या जंगलात सोडण्यात आले आहे.

Puja Bonkile

Cheetah Pawan: कुनो नॅशनल पार्कच्या परिसरात बंदिस्त असलेल्या पवन या नर चित्ताला दोन महिन्यांनंतर पुन्हा मोकळ्या जंगलात सोडण्यात आले आहे. नामिबियातून आणल्यानंतर पवनला 21 मार्च रोजी जंगलात सोडण्यात आले होते, परंतु त्याने वारंवार कुनोची सीमा ओलांडली. कधी शिवपुरीच्या माधव राष्ट्रीय उद्यानात तर कधी यूपीच्या सीमेवर जाऊन त्याला परत आणले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्याला 25 एप्रिलला कोंडून ठेवण्यात आले होते.

कुनोचे डीएफओ पीके वर्मा यांनी सांगितले की, सध्या 10 चित्ते जंगलात आहेत. जंगलात गौरव आणि शौर्य यांच्याशी झालेल्या झटापटीत अग्नि आणि वायु या दोन बिबट्यांना पुन्हा वापस आणण्यात आले आहे. सध्या सात चित्ते आणि एक बछडा आहे. यातील आणखी चार चित्ते जंगलात सोडण्यात येणार आहेत.

कुनो येथे स्थायिक झालेल्या चित्तांच्या सुरक्षेबाबत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे वन अधिकारी मंगळवारी ग्वालिअरमध्ये बैठक घेणार आहेत. खरे तर कुनो पार्कमधून बाहेर पडून यूपी सीमेपर्यंत चिते आल्याने तेथील अधिकारीही या प्रकल्पाशी जोडले जात आहेत.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांना चित्त्यांच्या संरक्षणासाठी उपकरणेही देणार आहे. या बैठकीला दोन्ही राज्यांचे मुख्य वन्यजीव वॉर्डन, एनटीसीएचे सदस्य सचिव एसपी यादव आणि अनेक बडे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या चित्ता पुनर्स्थापन या प्रकल्पाअंतर्गत भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा भारतात पुनरुज्जीवित करण्यासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका येथून 20 चित्ते आणले होते. सर्वात पहिले नामिबियातून 17 सप्टेंबर रोजी 8 चित्ते आणण्यात आले. त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले. त्यांना देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT