Viral Video
Viral Video Dainik Gomantak
देश

बाई! धावत्या ट्रेनखाली अडकूनही 'फोनवर गप्पा'; तरुणीचा व्हिडिओ व्हायरल

दैनिक गोमन्तक

एका महिलेच्या अंगावरून ट्रेन गेल्यानंतर ती सहजपणे उठून पुन्हा मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर धूमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ 12 एप्रिल रोजी आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता आणि गेल्या तीन दिवसांत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज ह्या व्हिडीओला मिळाले आहेत. (Chat on the phone even when stuck under a running train The girls video went viral)

“फोनवर गप्पागोष्टी करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे दीपांशू काब्राने व्हिडिओसह आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्हिडिओची सुरुवात रेल्वे स्टेशन ओलांडणाऱ्या मालगाडीपासून होते, रेल्वेने ट्रॅक ओलांडला चेहरा झाकून घेते ट्रेन पुढे गेल्यानंतर ती महिला रेल्वे रुळावरून उठून पुन्हा मोबाईलवर बोलायला सुरुवात करते.

मग फोनवर बोलत उठते आणि स्टेशनवरून चालत येते जणू सामान्य घटनाच घडली आहे. या क्लिपने ट्विटर युजर्सना थक्क करून टाकले आहे.

“नशीबवान आहे की या मालगाडीवर कोणतेही लटकणारे भाग नाहीत, अन्यथा जागीच तुकडे तुकडे झाले असते'' असे एका वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे. "तिला एक शौर्य पुरस्कार द्या, तिच्या थोबाडीमध्ये लगावा," आणखी एकाने जोडले.

काही युजर्सनी तर पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत महिलेला अटक करण्याची मागणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT