काँग्रेसचे (Congress) दिग्गज दलित नेते चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंजाब (Punjab) राजभवनात मुख्यमंत्रीपदाची (CM) शपथ घेतली आहे.  Dainik Gomantak
देश

चरणजीत सिंह चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

दैनिक गोमन्तक

चंदिगड: काँग्रेसचे (Congress) दिग्गज दलित नेते चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंजाब (Punjab) राजभवनात मुख्यमंत्रीपदाची (CM) शपथ घेतली आहे. राज्यपालांनी त्यांना शपथ दिली असून, सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) यांनी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तत्पूर्वी, राहुल गांधी देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची अपेक्षा होती. चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असतील. शपथविधी सोहळ्यापूर्वी चरणजीत सिंह चन्नी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांना भेटण्यासाठी आले होते.

दुसरीकडे, चरणजीत चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सुखजिंदरसिंग रंधावा, तृप्त राजिंदर सिंह बाजवा, कॅप्टन अमरिंदर सिंग, बहुतेक कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे अनेक आमदारही या कार्यक्रमाला पोहोचले आहेत.

सानिया गांधी चंदीगडला पोहोचल्या, पण तेथून थेट शिमल्याला गेल्या

दुसरीकडे, असे म्हटले जाते की, काँग्रेस अध्यक्षा सानिया गांधी सकाळी चंदीगडला आल्या होत्या, पण त्या पंजाबच्या कोणत्याही नेत्यांशी न बोलताच थेट शिमल्याला निघून गेल्या.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी चरणजीत सिंह चन्नी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. चरणजीत सिंह चन्नी सेक्टर 2 मधील त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडून जेडब्ल्यू मेरिट, चंदीगड येथे गेले आणि तेथील केंद्रीय निरीक्षकांसह त्यांनी राजभवन गाठले.

विनी महाजन आणि दिनकर गुप्ता यांची भेट

मुख्य सचिव विनी महाजन आणि डीजीपी दिनकर गुप्ता यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्या शपथविधी सोहळ्यात मुख्य सचिव विनी महाजन उपस्थित राहतील.

राजभवनात फक्त 40 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे. यात फक्त चन्नीचे नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि काही आमदारांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर चन्नी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे रवाना होतील. जिथे ते पंजाब भवन येथे दुपारी 12.30 वाजता प्रसारमाध्यमांना संबोधित करणार आहेत. शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम अत्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे. माध्यमांनाही ते कव्हर करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राजभवनच्या सूत्रांनी सांगितले की, कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाईल.

जाखर म्हणाले, रावत यांचे ट्विट मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवते दुसरीकडे, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी 2022 च्या निवडणुका नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अध्यक्षतेखाली लढल्या जातील असे सांगून मुख्यमंत्रिपदाच्या प्रतिष्ठेला दुखावले आहे.

शपथ घेण्यापूर्वी, चन्नी यांनी त्यांच्या मतदारसंघातील श्री चमकौर साहिब येथील गुरुद्वारा श्री काटलगढ साहिब येथे नमन केले. त्याचे कुटुंबही त्यांच्यासोबत होते. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत आणि काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक अजय माकन आणि हरीश रॉय चौधरी देखील चन्नी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सुखजिंदरसिंग रंधावा आणि सुनील जाखड हेही या कार्यक्रमात उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थिनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT