Chandrayaan-3 Dainik Gomantak
देश

Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची निर्मिती ते लँडिंग पर्यंतचा प्रवास, पाहा संपूर्ण मिशनची माहिती फक्त 60 सेकंदात

Chandrayaan-3: चांद्रयान-3 मोहिमेसाठी बुधवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयानचे लँडिंग बुधवारी सायंकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर होणार आहे.

Manish Jadhav

Chandrayaan-3: चांद्रयान-3 मोहिमेसाठी बुधवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयानचे लँडिंग बुधवारी सायंकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर होणार आहे. या निमित्ताने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) कडून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये चांद्रयान-3 मिशनची तयारी ते लँडिंगपर्यंतची स्थिती दाखवण्यात आली आहे. पीआयबीने जारी केलेला व्हिडिओ एका मिनिटाचा आहे.

दरम्यान, इस्रोच्या चांद्रयान-3 मिशनच्या लँडिंगबद्दल संपूर्ण देश उत्सुक आहे. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयानचे लँडिंग यशस्वी झाल्यास भारत इतिहास घडवेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कोणताही देश उतरलेला नाही.

त्याचबरोबर अमेरिका, रशिया (Russia), चीननंतर भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश ठरणार आहे. चांद्रयानच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपणही होणार आहे.

पीआयबीच्या व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हिडिओ चांद्रयान-3 मोहिमेच्या तयारीपासून सुरु होतो. यामध्ये वैज्ञानिकांची संपूर्ण टीम मिशनची तयारी करताना दिसत आहे.

चांद्रयान-3 स्पेसक्राफ्ट तयार करुन रॉकेटमध्ये ठेवले जात आहे आणि त्यानंतर ते प्रक्षेपणासाठी नेले जात असल्याचेही दिसून येते. रॉकेट प्रक्षेपित होते. त्यानंतर चांद्रयान मोहिमेची चंद्राकडे वाटचाल सुरु होते.

पुढे, व्हिडिओ अॅनिमेटेड आहे, ज्यामध्ये चांद्रयानचे लँडिंग दाखवले आहे. ते हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाला कसे स्पर्श करते आणि नंतर पृथ्वीला सिग्नल पाठवते.

त्यानंतर विक्रम लँडरचे रोव्हर येते. X वर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, चांद्रयान-3 मिशनच्या वैश्विक क्लायमॅक्सचे साक्षीदार व्हा. मिशन 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता लँड होईल.

चांद्रयानचे लँडिंग लाईव्ह पाहा

चांद्रयान मिशनचे लँडिंग इस्रोच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येईल. एक्स, यूट्यूब आणि फेसबुकवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. थेट लँडिंगचे प्रक्षेपण संध्याकाळी 5.27 वाजता सुरु होईल. याशिवाय, लँडिंग इस्रोच्या वेबसाइटवर थेट पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT