ISRO Chief Somanath & K Sivan  Dainik Gomantak
देश

'सिवन यांनी इस्रो प्रमुख होण्यापासून रोखले...', चांद्रयान-3 मोहिमेने इतिहास रचणाऱ्या सोमनाथ यांचा धक्कादायक खुलासा

Manish Jadhav

ISRO Chief Somanath: इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी केलेल्या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात खुलासा केला आहे की, इस्रोचे माजी प्रमुख के. सिवन यांनी त्यांना अंतराळ संस्थेचे अध्यक्ष होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.

दक्षिण भारतीय मीडिया संस्था मनोरमाने सोमनाथ यांच्या पुस्तकाचा हवाला देत एक रिपोर्ट लिहिला आहे. सोमनाथ यांनी हे खळबळजनक आरोप आपल्या आत्मचरित्र 'निलावु कुदिचा सिम्हांगल'मध्ये केल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुस्तकात म्हटले आहे की, चांद्रयान 2 मोहीम अयशस्वी झाली कारण ते आवश्यक चाचण्या न करता घाईघाईने प्रक्षेपित केले गेले.

सोमनाथ म्हणाले की, 60 वर्षांनंतर मुदतवाढ देऊन सेवेत राहिलेले ते आणि सिवन यांना AS किरण कुमार 2018 मध्ये पदावरुन निवृत्त झाल्यानंतर ISRO चेअरमन पदासाठी निवडण्यात आले होते.

मात्र, इस्रोचे अध्यक्ष झाल्यानंतरही सिवन यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (VSSC) संचालकपद सोडले नाही. जेव्हा सोमनाथ यांनी सिवन यांना त्या पदासाठी विचारले तेव्हा सिवन यांनी कोणतेही उत्तर न देता विलंब केला.

मात्र, अंतराळ केंद्राचे माजी संचालक डॉ बी एन सुरेश यांच्या मध्यस्थीनंतर सहा महिन्यांनी अखेर सोमनाथ यांची व्हीएसएससी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. इस्रोचे (ISRO) अध्यक्ष म्हणून तीन वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त होण्याऐवजी सिवन यांनी आपला कार्यकाळ वाढवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही सोमनाथ यांनी केला आहे.

सोमनाथ म्हणाले की, मला वाटते की इस्रोच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा यूआर राव स्पेस सेंटरच्या संचालकांना स्पेस कमिशनमध्ये नेण्यात आले होते, जेणेकरुन मला अध्यक्षपदापासून दूर ठेवता येईल.

दुसरीकडे, सोमनाथ यांनी असा दावाही केला की, ज्या दिवशी चांद्रयान-2 चंद्रावर उतरणार होते त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांच्या समूहापासून त्यांना दूर ठेवण्यात आले होते.

चांद्रयान- 2 चे लँडिंग अयशस्वी झाल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याचे सत्य सांगण्याऐवजी अध्यक्षांनी लँडरशी संपर्क स्थापित करणे शक्य नसल्याचे जाहीर केले. सोमनाथ त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, किरण कुमार चेअरमन असताना सुरु झालेल्या चांद्रयान-2 मिशनमध्ये सिवन यांनी अनेक बदल केले.

चांद्रयान-2 मोहिमेवर जास्त प्रसिद्धीचाही विपरित परिणाम झाला. त्यांचे सर्वात मोठे समाधान म्हणजे चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आले.

सोमनाथ यांचे स्पष्टीकरण

त्याचवेळी, दक्षिण भारतातील मीडिया इन्स्टिट्यूटमध्ये हा रिपोर्ट आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. यानंतर, पीटीआयला दिलेल्या निवेदनात इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी स्पष्ट केले की, त्यांची टिप्पणी विशेषत: कोणाच्या विरोधात नाही.

ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी शनिवारी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला एखाद्या संस्थेतील उच्च पदावर पोहोचण्यासाठी त्याच्या प्रवासादरम्यान कोणत्या ना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यांनीही जीवनात अशा अडचणींचा सामना केला आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी त्यांच्या आगामी आत्मचरित्र 'निलावु कुदिचा सिम्हांगल'मध्ये त्यांच्या दशकभराच्या प्रवासादरम्यान त्यांना आलेल्या काही आव्हानांचा उल्लेख केला आहे. “परंतु हे कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही,” असेही त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT