Video: चंद्रावर भूकंप? प्रज्ञान रोव्हरच्या संदेशाचा ISRO करतंय अभ्यास

Chandrayaan-3: भारताचे चांद्रयान-3 मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन सातत्याने नवीन अपडेट देत ​​आहे.
Chandrayaan-3
Chandrayaan-3Dainik Gomantak

Chandrayaan-3: भारताचे चांद्रयान-3 मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन सातत्याने नवीन अपडेट देत ​​आहे. अलीकडेच, चंद्राच्या पृष्ठभागावरुन घेतलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, परंतु यावेळी प्रकरण वेगळे दिसत आहे.

इस्रोला चंद्रावर भूकंप झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावरुन येणारी ही माहिती खरोखरच भूकंपाची आहे की आणखी काही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA) पेलोडने एक घटना नोंदवली आहे, जी नैसर्गिक घटनेशी किरकोळ साम्य असल्याचे दिसते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सांगितले की, आम्ही सर्व स्त्रोतांचा तपास करत आहोत. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप (APXS) उपकरणाने ऑक्सिजन (Oxygen) तसेच चंद्रावरील इतर काही लहान घटकांचा शोध घेतल्याची माहिती राष्ट्रीय अंतराळ संस्थेने दिली आहे.

Chandrayaan-3
Chandrayaan-3: आज अपुन चांद पे है... चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दुसरीकडे, प्रज्ञान रोव्हरमध्ये बसवण्यात आलेल्या मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टीम (MEMS) तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी चंद्रावर अनेक प्रकारच्या हालचालींचा शोध घेतला आहे.

26 ऑगस्ट रोजी अशीच एक घटना नोंदवण्यात आली आहे, जी पूर्णपणे नैसर्गिक आहे. इस्रोचे (ISRO) शास्त्रज्ञ या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Chandrayaan-3
Chandrayaan-3: 90 लाख लोकांनी ऑनलाइन पाहिले चांद्रयान 3 चे सॉफ्ट लॅंडिंग

हायड्रोजन शोधण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरमध्ये बसवण्यात आलेल्या LIBS उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाच्या संरचनेचे परीक्षण केले होते. तपासादरम्यान, चंद्रावर सल्फर असल्याची पुष्टी झाली होती.

रोव्हरच्या स्पेक्ट्रोस्कोपने वर्तवलेल्या अंदाजानुसार अॅल्युमिनियम (A), कॅल्शियम (C), लोह (F), क्रोमियम (CR), टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन आढळून आल्याचे इस्रोने सांगितले. इस्रोने सांगितले की, आता आमचा प्रयत्न हायड्रोजन शोधण्याचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com