Chandrayaan-2 Orbiter Took Photos Of Vikram Lander Of Chandrayaan 3. Dainik Gomantak
देश

Chandrayaan 3: "माझं तुझ्यावर लक्ष आहे," चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने पाठवले विक्रम लॅंडरचे फोटो

Chandrayaan 2: ऑर्बिटर हाय-रिझोल्यूशन कॅमेरा हा सध्या चंद्राभोवती फिरणारा हाय रिझोल्यूशन कॅमेरा आहे. यामध्ये सौर पॅनेलसह लँडर आणि डिसेंट प्रोपल्शन सिस्टम दिसत आहे.

Ashutosh Masgaunde

Chandrayaan-2 Orbiter Took Photos Of Vikram Lander Of Chandrayaan 3:

भारताची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 यशस्वी झाली आहे. बुधवारी संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयान-3 च्या लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले.

आता चांद्रयान-2 च्या ऑर्बिटर हाय-रिझोल्यूशन कॅमेरा (OHRC) ने चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे छायाचित्र टिपले आहे.

ऑर्बिटर हाय-रिझोल्यूशन कॅमेरा हा सध्या चंद्राभोवती फिरणारा हाय रिझोल्यूशन कॅमेरा आहे. यामध्ये सौर पॅनेलसह लँडर आणि डिसेंट प्रोपल्शन सिस्टम दिसत आहे.

याबाबत ची माहिती चांद्रयान-3 ची अधिकृत माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

या ट्विटमध्ये चांद्रयान-3 ला उद्देशून म्हटले आहे की, "माझं तुझ्यावर लक्ष आहे. चांद्रयान-2 च्या ऑरबिटरने चांद्रयान-3 च्या विक्रम लॅंडरचे छायाचित्र टिपले आहे. चांद्रयान-2 चे ऑरबिटर हाय-रिझोल्यूशन कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. सध्या चंद्रावर असा एकमेव कॅमेरा आहे."

चांद्रयान-३ ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे. पहिले, चांद्रयान-1, 2008 मध्ये प्रक्षेपित केले गेले आणि एक वर्ष चंद्राभोवती फिरले. दुसरे, चांद्रयान-2 (Chandrayaan 2), 2019 मध्ये प्रक्षेपित केले गेले, परंतु लँडिंग दरम्यान त्याचा लँडरशी संपर्क तुटल्याने ते अयशस्वी झाले.

या अपयशाने खचून न जाता भारताने चांद्रयान-3 च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे स्वप्न पूर्ण केले.

भारताने या चांद्रयान-3 मोहिमेसाठी तब्बल 600 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. याचे प्रक्षेपण 14 जुलै रोजी LVM3 रॉकेटद्वारे सतिश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथून करण्यात आले.

चांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर त्याने 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आणि बुधवारी सध्याकाळी 6:04 मिनिटांनी चांद्रयान 3 च्या विक्रम लॅंडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

Horoscope: सुवर्णयोग! वृषभ, मिथुनसह 5 राशींना प्रचंड आर्थिक लाभ आणि यश; मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टी टाळा

Goa Rain: हातातोंडाशी आलेला घास मातीमोल, 'पर्जन्यराजा' अवेळी कोपला; शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट

SCROLL FOR NEXT