IND vs NZ Champions Trophy 2025 Final Dainik Gomantak
देश

IND VS NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 'फ्री'मध्ये कुठे पाहता येणार? वेळ, ठिकाण सर्व जाणून घ्या

Champions Trophy 2025 Final: २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी सामना करेल.

Sameer Amunekar

IND vs NZ Champions Trophy 2025 Final Match Live Streaming

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडशी सामना करेल. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला हरवलं, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून बदला घेतला.

पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला आणि दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हा सामना ४४ धावांनी जिंकला. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलचा बदला घेतला.

त्याच वेळी, न्यूझीलंडनेही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने साखळी सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचा पराभव केला. किवी संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना कधी आणि कुठे खेळला जाईल ते जाणून घेऊया.

सामना कधी, कुठे , किती वाजता खेळला जाईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रविवारी 9 मार्च 2025 रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. त्याचा टॉस अर्धा तास आधी दुपारी 2:00 वाजता होईल.

टीव्हीवर कुठे पाहता येणार?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर थेट पाहू शकता.

लाईव्ह स्ट्रीमिंग

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर पाहू शकता.

भारत आणि न्यूझीलंड संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, ​​जेकब डफी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT