CJI U. U. Lalit, D. Y. Chandrachud Dainik Gomantak
देश

Centre Writes to CJI: उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करा! केंद्र सरकारचे सरन्यायाधीशांना पत्र

8 नोव्हेंबरला निवृत्त होणार लळित; डी. वाय. चंद्रचूड होणार पुढील सरन्यायाधीश

गोमन्तक डिजिटल टीम

Centre Writes to CJI: केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) विद्यमान सरन्यायाधीश (CJI) न्या. उदय उमेश लळित यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत पत्र लिहिले आहे. न्या. यु. यु. लळित हे 8 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभू्मीवर शुक्रवारी केंद्र सरकारने सरन्यायाधीशांना हे पत्र पाठवले आहे.

न्या. लळीत हे वकीली पेशातून थेट सर्वोच्च न्यायालयात प्रमोशन झालेले दुसरे सरन्यायाधीश आहेत. या पुर्वी न्या. एस. एम. सिकरी हे 1971 मध्ये 13 वे सरन्यायाधीश बनले होते. न्या. लळित यांचे वडील न्यायमुर्ती यु. आर. लळीत हे देखील वरिष्ठ विधिज्ञ होते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशही होते.

माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांचा कार्यकाल संपल्यानंतर न्या. यु. यु. लळित यांची 26 ऑगस्ट 2022 रोजी सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली होती. लळित यांना सरन्यायाधीश म्हणून 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत 74 दिवसांचा छोटा कार्यकाल लाभला आहे.

डी. वाय. चंद्रचूड होणार पुढील सरन्यायाधीश

सूत्रांच्या माहितीनुसार नवीन सरन्यायाधीश नेमण्याची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यासाबाबत पत्रात लिहिले आहे. निवृत्तीपुर्वी सरन्यायाधीश त्यांचा उत्तराधिकारी म्हणून वरिष्ठ न्यायाधीशाचे नाव सुचवतात.

या परंपरेनुसार न्या. लळीत यांच्यानंतर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड (D. Y. Chandrachud) हे पुढील सरन्यायाधीश असतील. चंद्रचूड हे देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचे वडील न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

Goa Assmbly Live: कदंब आणि कारमधील अपघातामुळे प्रवाशांना विलंब

Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

SCROLL FOR NEXT