Social Media Battle: राहुल गांधींच्या फोटोला टक्कर देण्यासाठी भाजपचं नव शस्त्र

Congress Vs BJP: राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे फोटो सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियापर्यंत नेहमीच चर्चेत असतात.
Rahul Gandhi  & PM Narendra Modi
Rahul Gandhi & PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे फोटो सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियापर्यंत नेहमीच चर्चेत असतात. जवळपास दररोज राहुल गांधींचा एखाद्या वृद्ध व्यक्तीसोबत किंवा लहान मुलासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. या सगळ्यामुळे राहुल यांच्या व्हायरल झालेल्या या फोटोंचा मुकाबला कसा करायचा, हे भाजप नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी यांच्यासमोर कठीण आव्हान आहे.

दरम्यान, भाजपची सध्याची रणनीती अशी आहे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एखादा फोटो व्हायरल होताच भाजपची सोशल मीडिया टीम पीएम मोदींचे फोटो व्हायरल करते. खरे तर हे सोशल मीडियाचे युग आहे. डिजिटल लढाई ही मैदानाइतकीच महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, भाजप सोशल मीडियाचा चॅम्पियन मानला जातो. मात्र भारत जोडो यात्रेने पहिल्यांदाच काँग्रेस भाजपला (BJP) टक्कर देत आहे.

Rahul Gandhi  & PM Narendra Modi
"मां.. मेरी मां...,'' 'भारत जोडो' यात्रेत Rahul Gandhi बनले श्रावणबाळ; काँग्रेसने केले ट्विट

दुसरीकडे, गुरुवारी राहुल गांधींचाही असाच एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये ते त्यांची आई आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या बुटाची लेस बांधताना दिसत होते. खरे तर, गुरुवारी सोनिया गांधीही 'भारत जोडो यात्रे' त सहभागी झाल्या. प्रवासादरम्यान सोनियांच्या बुटाची लेस सैल झाली. त्यांना चालताना त्रास होत असताना राहुल गांधी खाली बसले आणि त्यांनी आईच्या बुटाची लेस बांधली. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला.

आता राहुल यांच्या अशाप्रकारच्या फोटोला कसे सामोरे जायचे, हे आव्हान भाजप समर्थक आणि पक्षाच्या सोशल मीडिया (Social Media) टीमसमोर आहे. त्यांना पीए मोदींचा एक फोटो सापडला, ज्यामध्ये पंतप्रधान एका गरीब महिलेच्या पायात चप्पल घालताना दिसत आहेत. मोदी समर्थकांचा दावा आहे की, 'पंतप्रधान मोदी देशाच्या प्रत्येक मातेचा आदर करतात. केवळ राहुलच आईचा आदर करतात असं नाही.'

Rahul Gandhi  & PM Narendra Modi
भारत जोडो यात्रेच्या पोस्टरमध्ये सावरकरांचा फोटो, भाजप-Congress पुन्हा आमने-सामने

याआधी, राहुल गांधी यांचा पावसात भिजत भाषण करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपच्या सोशल मीडिया टीमने नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे असेच फोटो शेअर करायला सुरुवात केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com