CERT-In Android Warning: देशातील कोट्यवधी अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी केंद्र सरकारने धोक्याचा इशारा जारी केला. गृह मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या 'इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT-In) या संस्थेने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये एक गंभीर त्रुटी (Vulnerability) शोधून काढली. या त्रुटीचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या फोनचा ताबा घेऊ शकतात, असा इशारा सरकारने दिला.
एजन्सीने जारी केलेल्या अधिकृत नोट क्रमांक CIVN-2026-0016 नुसार, अँड्रॉइड स्मार्टफोनमधील 'डॉल्बी ऑडिओ' (Dolby Audio) या लोकप्रिय फीचरमध्ये तांत्रिक बिघाड आढळला आहे. या त्रुटीचा वापर करुन हॅकर्स युझर्सच्या फोनमध्ये 'मालवेअर' (Malware) म्हणजेच धोकादायक सॉफ्टवेअर इंजेक्ट करु शकतात. एकदा का हा मालवेअर फोनमध्ये शिरला की, हॅकर्स तुमच्या फोनमधील खाजगी डॉक्युमेंट्स, गॅलरीमधील फोटो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची 'बँक डिटेल्स' चोरु शकतात.
सरकारी एजन्सीने या धोक्याला 'हाय रिस्क रिमोट कोड एक्झिक्यूशन' असे म्हटले. अँड्रॉइड ही एक ओपन-सोर्स ऑपरेटिंग सिस्टिम असल्याने तिचा वापर केवळ स्मार्टफोनच नाही, तर स्मार्ट वॉच, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्हीमध्येही केला जातो. या तांत्रिक बिघाडामुळे हॅकरला तुमच्या डिव्हाइसचा 'रिमोट एक्सेस' मिळू शकतो. म्हणजेच, हॅकर जगाच्या पाठीवर कुठेही बसून तुमच्या फोनमधील माहिती हाताळू शकतो किंवा तुमच्या डिव्हाइसची मेमरी करप्ट करु शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, अँड्रॉइडमधील ही तांत्रिक त्रुटी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2025 मध्ये पहिल्यांदा लक्षात आली होती. तेव्हापासून गुगल यावर काम करत आहे. या त्रुटीमुळे गुगल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर चालणारे सर्व स्मार्टफोन आणि टॅब्लेट प्रभावित होऊ शकतात, असे सरकारने आपल्या चेतावणीमध्ये नमूद केले. विशेषतः ज्या युझर्सनी त्यांचे फोन दीर्घकाळ अपडेट केलेले नाहीत, त्यांच्यावर हा धोका सर्वाधिक आहे.
CERT-In ने कोट्यवधी अँड्रॉइड युझर्सना तातडीने आपला स्मार्टफोन अपडेट करण्याचा सल्ला दिला. गुगलने या त्रुटीवर मात करण्यासाठी 'जानेवारी 2026' चा सिक्युरिटी पॅच (Security Patch) रिलीज केला. युझर्सनी त्यांच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'सिस्टिम अपडेट' तपासावे आणि नवीन अपडेट उपलब्ध असल्यास ते त्वरित इन्स्टॉल करावे. हे अपडेट केल्यामुळे हॅकर्सना फोनमध्ये प्रवेश मिळवणे अशक्य होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.