Ration Card e-KYC Dainik Gomantak
देश

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी; लगेच करा 'हे' काम, अन्यथा धान्य मिळणार नाही

Ration Card EKYC Last Date: राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यानं रेशन कार्डांच्या ई-केवायसी प्रक्रेसंदर्भात अंतिम मुदत जाहीर केली आहे.

Sameer Amunekar

पणजी : राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्यानं रेशन कार्डांच्या ई-केवायसी प्रक्रेसंदर्भात अंतिम मुदत जाहीर केली आहे. खात्यानं काढलेल्या अधिसूचनेनुसार, ३० एप्रिल २०२५ ही रेशन कार्डांच्या ई-केवायसीसाठी अंतिम मुदत असेल.

जर या मुदतीपर्यंत संबंधित नागरिकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांच्या रेशन कार्डावरील नावं वगळण्यात येतील, असा स्पष्ट इशारा पुरवठा खात्यानं दिला आहे. त्यामुळे अनेकांना शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा लाभ पुढे मिळणार नाही.

ई-केवायसी ही प्रक्रिया रेशन कार्डाच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक ठिकाणी बनावट कार्डधारकांच्या तक्रारी आढळल्यानंतर ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

राज्यभरातील रेशनकार्डधारकांनी जवळच्या ई-सुविधा केंद्रांमध्ये किंवा अधिकृत सेवा केंद्रांमध्ये जाऊन आधार कार्ड व रेशन कार्डासह ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही सेवा ऑनलाइन स्वरूपात देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासंदर्भात नागरी पुरवठा विभागाकडून जनजागृती मोहिमाही राबवली जात आहे. स्थानिक गाव पंचायत कार्यालये, नगरपालिका कार्यालये, तसेच रेशन दुकानदार यांच्यामार्फत नागरिकांना माहिती दिली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Weekly Love Horoscope: प्रेमात नवा उत्साह! 'या' आठवड्यात 5 राशींना अनुभवता येईल आनंद आणि प्रेमातील बदल

SCROLL FOR NEXT