Delhi University Dainik Gomantak
देश

दिल्ली विद्यापीठात नवीन B.TECH अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना केंद्राकडून प्रलंबित

बीटेक कोर्सेस व्यतिरिक्त, डीयू वेबसाइटने मानविकी, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग इत्यादी विभाग सूचीबद्ध केले आहेत.

दैनिक गोमन्तक

दिल्ली: दिल्ली विद्यापीठात तीन नवीन बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे परंतु त्याला केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दिल्ली विद्यापीठातील तीन नवीन बीटेक अभ्यासक्रम केंद्राकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता न मिळाल्याने सध्या प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. DU अभ्यासक्रमाला केंद्राकडून अद्याप मान्यता मिळणे बाकी असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

(The Center plans to launch a new B.TECH course at Delhi University)

डिसेंबर 2021 मध्ये, डीयूच्या वैधानिक संस्थेने तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या समावेशास मान्यता दिली होती. TOI च्या अहवालानुसार, यामध्ये संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमधील बीटेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर टेक्नॉलॉजी फॅकल्टीमध्ये सुधारणा करण्यात आली आणि नवीन प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली.

DU मधील 3 नवीन BTech अभ्यासक्रम केंद्राकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत

दिल्ली विद्यापीठानेही या नवीन विभागांसाठी नवीन शैक्षणिक विभाग स्थापन करण्याची घोषणा केली होती. डीयूने अभ्यासक्रमाचे साहित्य आणि रचना तयार करण्यासाठी एक समितीही स्थापन केली होती. BTech अभ्यासक्रमांव्यतिरिक्त, DU वेबसाइटने मानविकी, आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, उत्पादन आणि औद्योगिक अभियांत्रिकी आणि यांत्रिक अभियांत्रिकी विभाग देखील सूचीबद्ध केले आहेत.

अभ्यासक्रम कोणत्या सत्रापासून सुरू होईल?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर, डीयू हे तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करणारे पुढील विद्यापीठ असेल. विद्याशाखेचे डीन के एस राव म्हणाले की, विद्यापीठाला या शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रम सुरू करायचा आहे. पैसे आणि मनुष्यबळासाठी आम्ही शिक्षण मंत्रालयाच्या मंजुरीची वाट पाहत असल्याने आम्ही प्रवेशाची सूचना केलेली नाही. माहिती देताना ते म्हणाले की, देशातील इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांप्रमाणे व विहित प्रक्रियेनुसार आम्हीही संयुक्त प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रीडा विश्वात मोठी खळबळ! भारतीय खेळाडूकडून हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, पोलिसांकडून कारवाई

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT