Odisha Train Accident Dainik Gomantak
देश

Odisha Train Accident: बालासोर दुर्घटनेप्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

CBI Arrested 3 Railway Employees: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.

Manish Jadhav

CBI Arrested 3 Railway Employees: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने या ट्रेन अपघातात 3 जणांना अटक केल्याची बातमी आहे.

विशेष म्हणजे, ओडिशा रेल्वे अपघातात सुमारे 290 लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 1200 लोक जखमी झाले. सीबीआयच्या (CBI) अहवालात अरुणकुमार महंत (वरिष्ठ विभाग अभियंता, बालोर), मोहम्मद अमीर (विभाग अभियंता, सोरो) आणि पप्पू कुमार (तंत्रज्ञ) अशी अटक करण्यात आलेल्यांची ओळख पटली आहे.

दरम्यान, गेल्या 25 वर्षांतील देशातील सर्वात मोठ्या रेल्वे अपघातांपैकी एक, चेन्नई-जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस, हावडा-जाणारी SMVT सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मालगाडीचा बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात (Accident) 290 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते.

बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ भरधाव वेगात असलेली कोरोमंडल एक्सप्रेस मुख्य मार्गाऐवजी पासिंग लूपमध्ये घुसली आणि थांबलेल्या मालगाडीला धडकली. या धडकेनंतर अनेक डबे रुळावरुन घसरले. तर डाऊन मार्गावर येणाऱ्या एसएमव्हीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या मागील भागावर काही डबे आदळले.

दुसरीकडे, या अपघातानंतर रेल्वेने आधी सीआरएस चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर सीबीआय चौकशीचे आदेशही दिले.

अपघातानंतर, रेल्वेने दक्षिण पूर्व रेल्वेच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, ज्यांच्या अधिकारक्षेत्रात ही दुर्घटना घडली. प्रारंभिक तपासणीत अपघाताचे संभाव्य कारण म्हणून निष्काळजीपणाने किंवा हेतुपुरस्सर सिग्नलिंग हस्तक्षेपाकडे लक्ष वेधले गेले.

सीआरएस अहवालात मानवी त्रुटी समोर आल्या

अलीकडेच, कमिश्नर रेलवे सेफ्टी (CRS) यांचा नुकताच एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये रेल्वे अपघातामागे मानवी चुका असल्याचे सांगण्यात आले.

यापूर्वीच्या इशाऱ्याची माहिती दिली असती तर दुर्घटना टाळता आली असती, असे संकेत मिळत असल्याचे अहवालात सांगण्यात आले. मात्र, ‘अनेक पातळ्यांवर चुका’ झाल्याची चर्चा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT