CBI  Dainik Gomantak
देश

Sandeshkhali Case: संदेशखळी प्रकरणी सीबीआयने पाच जणांविरुद्ध नोंदवला पहिला एफआयआर; आरोपींची नावे गुपीत

Manish Jadhav

Sandeshkhali Case: सीबीआयने पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे जमीन हडप आणि लैंगिक छळ प्रकरणी पाच प्रभावशाली लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण जमीन हडपण्याचे आहे, जिथे पीडित कुटुंबातील महिलांचाही लैंगिक छळ करण्यात आला. मात्र, सीबीआयने अद्याप पाच आरोपींची नावे उघड केलेली नाहीत.

कोलकाता उच्च न्यायालयाने 10 एप्रिल रोजी संदेशखळी येथील महिलांवरील गुन्हे आणि जमीन बळकावल्याप्रकरणी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपास करण्याचे आदेश दिले होते. न्यायाच्या हितासाठी निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते. सीबीआयने अशा प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ईमेल आयडी देखील जारी केला होता. याद्वारे सीबीआयकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या.

सीबीआयने आरोपांबद्दल अधिक चौकशी करण्यासाठी संदेशखळी येथे एक पथक पाठवले होते, जिथे आरोपांची प्रथमदर्शनी पडताळणी करता येईल. हिंसाचारग्रस्त भागाच्या भेटीदरम्यान सीबीआयने जमीन बळकावणे आणि महिलांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला होता.

प्रकरण काय होते?

कोलकात्यापासून 100 किमी अंतरावर सुंदरबनच्या सीमावर्ती भागात वसलेल्या संदेशखळीमध्ये गेल्या वर्षभरापासून हिंसाचार सुरु होता. खरे तर, गावातील महिलांनी अलीकडेच आरोप केला होता की, टीएमसी नेते शाहजहान शेख आणि इतर टीएमसी नेत्यांनी त्यांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्या. तर काही महिलांनी टीएमसी नेत्यांवर लैंगिक शोषणाचा देखील आरोप केला. याबाबत संदेशखळी येथे महिलांनी निदर्शने केली. दरम्यान, संदेशखळी येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही पीडित महिलांच्या न्यायिक हितासाठी अधिक आक्रमकरित्या आंदोलन केले. शाहजहान शेख हे रेशन घोटाळ्यातील आरोपी असून नुकताच ईडीच्या पथकावर झालेल्या हल्ल्यातही ते आरोपी आहेत. तर दुसरीकडे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर या मुद्द्यावरुन राजकारण केल्याचा आरोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT