CBI Dainik Gomantak
देश

CBI Case: 1200 कोटींचे Electoral Bond खरेदी करणाऱ्या कंपनीवर CBI कडून गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहेत आरोप

Megha Engineering and Infrastructure Ltd: आता मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. याप्रकरणी सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे.

Manish Jadhav

CBI Case: सर्वाधिक निवडणूक देणग्या देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत मेघा इंजिनिअरिंगचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. आता मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. याप्रकरणी सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे.

आठ जणांवर गुन्हा दाखल

NISP च्या ₹315 कोटींच्या प्रकल्पात कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी CBI ने Megha Engineering and Infrastructure Ltd, NMDC आयर्न अँड स्टील प्लांट आणि पोलाद मंत्रालयाशी संबंधित एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयला NISP आणि NMDC चे आठ अधिकारी आणि MECON लिमिटेडच्या दोन अधिकाऱ्यांनी MNDC ने मेघा इंजिनियरिंग अँड इंडस्ट्रियल लिमिटेडला देय देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याची तक्रार प्राप्त केली होती. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, जगदलपूर स्टील प्लांटशी संबंधित कामांच्या संदर्भात मेघा इंजिनिअरिंगचे 174 कोटी रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी सुमारे 78 लाख रुपयांची कथित लाच घेण्यात आली होती. एनआयएसपी आणि एनएमडीसीचे आठ अधिकारी आणि मेकॉनच्या दोन अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नुकत्याच उघड झालेल्या डेटावरुन असे दिसून आले आहे की, मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही इलेक्टोरल बाँड्सची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खरेदीदार आहे. पामिरेड्डी पिची रेड्डी आणि पीव्ही कृष्णा रेड्डी यांनी प्रोत्साहन दिलेले MIIL द्वारे 966 कोटी रुपयांचे रोखे विकत घेतले. मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने भाजपला सर्वाधिक 586 कोटी रुपयांची निवडणूक देणगी दिली होती. यासोबतच मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून बीआरएसला 195 कोटी रुपये, डीएमकेला 85 कोटी रुपये, वाईएसआरसीपीला 37 कोटी रुपये, टीडीपीला 25 कोटी रुपये आणि काँग्रेसला 17 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT