CBI Raid Delhi: सीबीआयने दिल्लीत छापेमारी करुन मुलांचे अपहरण आणि विक्री करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. सीबीआयने आतापर्यंत मानवी तस्करांच्या तावडीत सापडलेल्या सुमारे 8 नवजात बालकांची सुटका केल्याचे सांगण्यात आले. सीबीआयच्या पथकाने दिल्लीतील केशवपुरम भागात छापा टाकला असून येथूनही दोन मुलांची सुटका करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासानुसार, ही टोळी रुग्णालयातून मुलांची चोरी करायची आणि नंतर विक्री करायची, असा अंदाज वर्तवला जात आहे. केशवपुरममध्ये सीबीआयने छापेमारी केली, त्यांच्याबरोबर स्थानिक पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आणि मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याचे बोलले जात आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील केशवपुरममध्ये सीबीआयच्या छाप्यादरम्यान दोन नवजात बालके सापडली आहेत. ज्यांना पथकाने ताब्यात घेतले असून दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी वॉर्ड बॉय, महिला आणि इतरांसह काही लोकांना अटक केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ही टोळी चार ते पाच लाख रुपयांना मुलांना विकायची, असे बोलले जात आहे. ते भाड्याच्या घरात राहत होते आणि तिथून आपली टोळी चालवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या छाप्यात दिल्ली एनसीआरमधून 7 ते 8 मुले जप्त करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी हे आरोपी भाड्याने घर घेऊन राहत होते, त्याच ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. सुमारे 11 महिन्यांपूर्वी या आरोपींनी हे घर भाड्याने घेतले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.