CBI Action on Sameer Wankhede Dainik Gomantak
देश

CBI Action on Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, सीबीआयने नोंदवला भ्रष्टाचाराचा गुन्हा!

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर अनेक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

Manish Jadhav

CBI Action on Sameer Wankhede: एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर अनेक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. यानंतर सीबीआयने (CBI) दिल्ली, मुंबई आणि रांचीसह 29 ठिकाणी एकामागून एक छापे टाकले.

दरम्यान, लाचखोरी प्रकरणात वानखेडे आणि इतरांची चौकशी करण्यासाठी एनसीबीने सीबीआयला पत्र लिहिले होते. विशेष तपास पथकाने (एसआयटी) कॉर्डेलिया छाप्यात तफावत आढळून आल्यानंतर आणि आर्यन खानला क्लीन चिट दिल्यानंतर

गेल्या वर्षी वानखेडे यांना एनसीबीमधून काढून टाकण्यात आले होते. वानखेडे हे सध्या चेन्नई (Chennai) येथील डायरेक्टर जनरल ऑफ टॅक्सपेयर्स सर्व्हिसेस (DGTS) च्या कार्यालयात तैनात आहेत.

गेल्या आठवड्यात, NCB ने पोलिस अधीक्षक दर्जाचे अधिकारी - विश्व विजय सिंह यांना एजन्सीच्या सेवेतून काढून टाकले.

वानखेडे हे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत. 2021 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली, NCB ने जहाजातून 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रोन, 21 ग्रॅम गांजा, 22 MDMA गोळ्या आणि ₹ 1.33 लाखाची रोकड जप्त केल्याचा दावा केला होता.

एजन्सीने 14 लोकांना पकडले होते. यामध्ये आर्यन खान (24), अरबाज मर्चंट (26) आणि मुनमुम धमेचा (28) यांना काही तासांच्या चौकशीनंतर 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यानंतर, एजन्सीने छापे टाकल्याप्रकरणी आणखी 17 जणांना अटक केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सच्या आधारे, वानखेडे यांच्या टीमने आरोपी मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला होता. आर्यन खान स्व:ता काही परदेशी ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे, चॅटमध्ये "हार्ड ड्रग्स" असा उल्लेख करण्यात आला होता.

तथापि, एनसीबीचे दावे फेटाळताना, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नितीन डब्लू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये म्हटले होते की, कोणत्याही कटाचे अस्तित्व सूचित करणारे कोणतेही पुरावे नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT