Mahua Moitra Dainik Gomantak
देश

Video: संसदेच्या एथिक्स समितीच्या कार्यालयात राडा, महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केले वॉकआउट

Cash For Query Controversy TMC MP Mahua Moitra: गुरुवारी संसदेच्या एथिक्स समितीच्या बैठकीत गदारोळ झाला.

Manish Jadhav

Cash For Query Controversy TMC MP Mahua Moitra: गुरुवारी संसदेच्या एथिक्स समितीच्या बैठकीत गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, बसपा खासदार दानिश अली आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी बैठकीतून वॉकआऊट केले.

पत्रकारांनी त्यांना वॉकआउटचे कारण विचारले असता महुआ मोइत्रा यांनी एका महिलेला पर्सलन प्रश्न विचारले जात असल्याचे उत्तर दिले. एथिक्स समिती अनैतिक गोष्टी विचारत आहे. त्याचवेळी दानिश अली यांनी सांगितले की, एथिक्स समितीच्या बैठकीत एका महिलेचे चीरहरण करण्यात येत आहे.

दरम्यान, महुआ मोईत्रा यांना विचारण्यात आले की, तुम्ही रात्री कोणाशी बोलता? तुम्ही कधी कोणाशी बोललात? त्या हॉटेलमध्ये कोणाला भेटलात? मात्र, याविरोधात आम्ही आवाज उठवला तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की, ते गोपनीय आहे, मात्र एका सदस्याने सर्व माहिती लीक केली. एका महिलेला (Women) अनैतिक प्रश्न विचारण्यात आले, असे महुआ म्हणाल्या.

असे प्रश्न महिलेला विचारणे अयोग्य

जनता दल युनायटेड (जेडीयू) खासदार गिरीधारी यादव म्हणाले की, त्यांनी महिला खासदाराला (टीएमसी खासदार महुआ मोईत्रा) पर्सनल प्रश्न विचारले. त्यांना पर्सनल प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो.

त्याचवेळी, काँग्रेस (Congress) खासदार उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की, सर्व प्रश्नांवरुन असे दिसते की ते (संसदीय आचार समितीचे अध्यक्ष) कोणाच्या तरी निर्देशानुसार काम करत आहेत. हे खूप वाईट आहे.

दोन दिवसांपासून आम्ही त्यांना काही गोष्टी विचारत आहोत. ते त्यांना (महुआ मोईत्रा) विचारत आहेत तुम्ही कुठे चालला आहात? तुम्ही कोणाला भेटत आहात? तुम्ही आम्हाला तुमचे फोन रेकॉर्ड देऊ शकता का? तुमच्याकडे कोणत्याही कॅश ट्रान्सफरचा पुरावा आहे का?

महुआ मोइत्रा म्हणाल्या...

वादापूर्वी एथिक्स समितीने खासदार महुआ मोईत्रा यांना पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्याबाबत अनेक प्रश्न विचारले. यादरम्यान महुआ मोइत्रा यांनी स्वत:ला निर्दोष घोषित केले.

मात्र, त्यांनी आपला संसदीय लॉगिन आयडी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना दिल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, लॉगिन आयडी फक्त प्रश्न विचारण्यासाठी वापरला गेला होता. राष्ट्रीय सुरक्षेची कोणतीही समस्या नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.

महुआ मोइत्रा यांनी असेही म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहादराई यांच्याशी असलेले संबंध बिघडल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे, ज्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) कडे तक्रार केली होती.

एथिक्स समितीने महुआ मोईत्रा यांना का बोलावले?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते, ज्यामध्ये महुआ मोइत्रा यांनी अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या आरोपानंतर लोकसभा अध्यक्षांनी हे प्रकरण एथिक्स समितीकडे पाठवले होते. महुआ मोईत्रा देशात असताना त्यांचा संसदीय लॉगिन आयडी दुबईत उघडण्यात आल्याचा आरोपही निशिकांत यांनी केला होता. यानंतर एथिक्स समितीने महुआ मोईत्रा यांना बोलावले.

एथिक्स समितीने अहवालाच्या आधारे गृह मंत्रालय, आयटी आणि परराष्ट्र मंत्रालयाला समन्स बजावले आहे. भाजपने अधिकृत लॉगिन क्रेडेन्शियल्स शेअर करण्यावर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT