Lieutenant Rajendra Nimbhorkar Dainik Gomantak
देश

India Pakistan Tension: पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकू शकतो का? उरी सर्जिकल स्ट्राईकचे हिरो मराठमोळे लेफ्टनंट जनरल काय म्हणाले?

Pakistan Nuclear Threat: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सध्या संतापाची लाट आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे लोक म्हणू लागले आहेत. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सध्या संतापाची लाट आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे लोक म्हणू लागले आहेत. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. निष्पाप लोकांच्या हत्येनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. याचदरम्यान, उरी सर्जिकल स्ट्राईकचे हिरो मराठमोळे लेफ्टनंट राजेंद्र निंभोरकर यांच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

निंभोरकर यांनी एका मराठी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानविरोधात (Pakistan) कठोर पाऊल उचलण्याची गरज बोलून दाखवली. त्यांनीही पाकिस्तान पुरस्कृत या भ्याड हल्ल्याचा निषेध करत भारताने कोणत्या प्रकारची पाऊल उचलली पाहिजे याविषयी सविस्तर सांगितले.

काय म्हणाले उरी सर्जिकल स्ट्राईकचे हिरो मराठमोळे लेफ्टनंट?

मुलाखतीदरम्यान लेफ्टनंट निंभोरकर यांनी पाकिस्तानला आता अद्दल शिकवण्याची वेळ आली असल्याची नमूद केले. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा पाकिस्तान आण्विक हल्ल्याची धमकी देतो. पाकिस्तान खरचं असे पाऊल उचलू शकतो का? भारत (India) आणि पाकिस्तान यांची आण्विक तयारी कशी आहे? असा मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारला असता त्यावर लेफ्टनंट निंभोरकर म्हणाले की, पाकिस्तानने एक स्ट्रटजिक रेड लाईन ड्रॉ करुन ठेवली आहे. त्यांचा खान युसुफिया नावाचा एका स्ट्रटजिक अॅनिलिस्ट होता. कोणतेही सैन्य पाकिस्तानच्या सीमेकडे येऊ लागले की आपण आण्विक हल्ला करु अशी धमकी तो द्यायचा. पण आण्विक हल्ल्याची धमकी देणे पाकिस्तानच्या स्ट्रॅटजीचा एक भाग राहिला आहे.

निंभोरकर यांनी पुढे पाकिस्तान माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलेल्या आण्विक हल्ल्याच्या धमकीचाही दाखला दिला. निंभोरकर म्हणाले की, आताची परिस्थिती पाहता पाकिस्तानने जर आण्विक हल्ला केलाच तर आपण तो हल्ला पचवून पाकिस्तानवर मोठा आण्विक हल्ला करु शकतो. आपण केलेल्या हल्ल्यात पाकिस्तान राहणार नाही. पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT