Call Girl Booking App Scam Dainik Gomantak
देश

कॉल गर्ल बुकिंग अ‍ॅपवरुन करोडोंची फसवणूक, इंस्टाग्रामवरुन मुलींचे फोटो चोरायचे; सेक्सच्या नावाखाली...

Call Girl Booking App Scam: कॉल गर्ल बुकिंग अ‍ॅपवरुन करोडोंची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Call Girl Booking App Scam: कॉल गर्ल बुकिंग अ‍ॅपवरुन करोडोंची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानमध्ये पाच जणांची टोळी अशाप्रकारची फसवणूक करत होती.

बनावट कॉल गर्ल अ‍ॅप तयार करुन आरोपींनी केवळ दहा-वीस नव्हे तर 800 हून अधिक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले. ही टोळी गेल्या सहा महिन्यांपासून सक्रिय होती. या काळात टोळीच्या सदस्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली.

या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी अटक केली आहे. लोकांना लुटण्याची पद्धत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...इंस्टाग्रामवरुन मुलींचे फोटो चोरायचे.

इंस्टाग्रामवरुन मुलींचे फोटो चोरायचे

'आज तक'च्या रिपोर्टनुसार, टोळीच्या सदस्यांनी बनावट कॉल गर्ल अ‍ॅप तयार केले होते. या अ‍ॅपमध्ये त्यांनी अनेक मुलींची प्रोफाईल्स तयार केली होती. प्रोफाईल फेक नसल्याचा युजरचा विश्वास बसावा म्हणून प्रोफाईलमध्ये त्याच मुलीचे अनेक फोटो पोस्ट करण्यात आले होते.

यासाठी टोळीचे सदस्य इंस्टाग्रामवरुन (Instagram) मुलींचे फोटो चोरायचे, ज्यांचे प्रोफाईल इंस्टाग्रामवर प्रायव्हेट नाही अशा मुलींचे फोटो डाउनलोड केले जाऊ शकतात.

टोळीचे सदस्य ज्या मुलींचे प्रोफाईल सार्वजनिक होते त्यांना टार्गेट करायचे आणि नंतर त्यांचे अनेक फोटो चोरुन कॉल गर्ल बुकिंग अ‍ॅप्सवर पोस्ट करायचे.

सेक्सच्या बहाण्याने कट

कॉल गर्ल्स बुक करण्यासाठी अ‍ॅप व्यतिरिक्त आरोपींनी इतर अनेक पद्धतींचा अवलंब केला होता. ते लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट कॉल गर्ल्सचे फोटो पाठवत असे.

ग्राहकाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी टोळीतील सदस्य मुली असल्याचे भासवून त्यांच्याशी गप्पाही मारत असत. ग्राहकासोबत दर निश्चित झाला की, ते त्याला भेटण्यासाठी निर्जन ठिकाणी बोलवायचे.

टोळीतील अनेक जण मुलीला घेऊन त्या ठिकाणी पोहोचायचे. आणि ग्राहकाकडून (Customer) पैसे घ्यायचे. यानंतर ग्राहकाने मुलीसोबत जायचे आहे असे सांगितले असता, ते त्याला बंदूकीचा धाक दाखवून तेथून पळवून लावायचे.

पाच कोटींहून अधिकची फसवणूक

कॉल गर्ल बुकिंग अ‍ॅपमागील सूत्रधार राकेश मीना नावाचा व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी गेल्या सहा महिन्यांपासून सक्रिय होती. या टोळीने 800 हून अधिक लोकांना अडकवून 5 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी सूत्रधाराला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT