Supreme Court  Dainik Gomantak
देश

Supreme Court: CAA ला स्थगिती नाही! 200 हून अधिक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; आता 9 एप्रिलला सुनावणी

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी CAA बाबत नरेंद्र मोदी सरकारकडून उत्तर मागितले आहे.

Manish Jadhav

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी CAA बाबत नरेंद्र मोदी सरकारकडून उत्तर मागितले आहे. CAA संदर्भात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, न्यायालय 9 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. CAA संदर्भात एकूण 237 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

सॉलिसिटर जनरल यांनी वेळ मागितला

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिका आणि अर्जांना उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. त्यांनी युक्तिवाद केला की, एकूण 237 याचिका आहेत. स्टेसाठी 20 अर्ज आले आहेत. मला उत्तर देण्यासाठी वेळ हवा आहे. ते म्हणाले की सीएएच्या अंमलबजावणीमुळे कोणीही त्यांचे नागरिकत्व गमावणार नाही. याबाबत याचिकाकर्त्यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे.

सिब्बल यांनी आक्षेप घेतला

एसजी मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्राला किमान चार आठवड्यांचा वेळ हवा आहे. त्यावर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला. स्टे अर्जांना प्रतिसाद देण्यासाठी ही वेळ खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. सिब्बल यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, जर नागरिकत्वाबाबत प्रक्रिया सुरु झाली तर ती परत घेता येणार नाही. आत्तापर्यंत वाट पाहिली असेल तर जुलैमध्ये न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वाट बघता येईल, असे ते म्हणाले. एवढी काय काय घाई आहे? असा सवालही त्यांनी आपल्या युक्तिवादात उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT