Three BSF personnel injured in border attack Dainik Gomantak
देश

BSF Soldiers Attack: भारत-बांगलादेश सीमेवर तस्करांचा उच्छाद! जमावाकडून बीएसएफ जवानांवर जीवघेणा हल्ला; 3 जखमी, 8 अटकेत VIDEO

BSF Soldiers Attacked India Bangladesh Border: भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरातील सिपाहीजला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांवर एका संतप्त जमावाने जीवघेणा आणि हिंसक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Manish Jadhav

BSF Soldiers Attcaked Video: भारत-बांगलादेश सीमेवर त्रिपुरातील सिपाहीजला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांवर एका संतप्त जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या भीषण हल्ल्यात बीएसएफचे तीन जवान गंभीररीत्या जखमी झाले. एका संशयित तस्कराला ताब्यात घेतल्यानंतर चिडलेल्या स्थानिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन जवानांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात जवानांची डोकी फुटली असून त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करत आठ हल्लेखोरांना अटक केली असून, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या हिंसक घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सोमवारी आशाबाडी सीमा चौकीजवळ घडली. एका संशयित तस्कराला बीएसएफने ताब्यात घेतले असता, जमावाने जवानांना घेरले आणि त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

त्रिपुरात बीएसएफ जवानांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये दुर्गापूर गावात तस्करी रोखताना जमावाने केलेल्या हल्ल्यात 3 जवान जखमी झाले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये बिशालगड येथे पशुतस्करांना अडवल्याने झालेल्या दगडफेकीत 5 जवान गंभीर जखमी झाले होते.

मुख्यमंत्री माणिक साहा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची गंभीर दखल घेत कडक इशारा दिला. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलांवर अशा प्रकारे हल्ले करणे पूर्णपणे अमान्य आणि सहनशीलतेच्या बाहेर आहे, असे स्पष्ट करत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे संकेत दिले. त्याचवेळी, पोलिसांनी कलामचौरा पोलीस ठाण्यात काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. सीमेवरील तस्करीच्या वाढत्या नेटवर्कमुळे आणि अशा हिंसक हल्ल्यांमुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सासष्टीत काँग्रेससमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीशिवाय पर्याय नाही; नावेली, बाणावली, नुवेत आव्हान अधिक कठीण

PM Modi Speech: सत्तेतील अधिकार, नोकरशाहीचा प्रभाव आणि उद्योगांची अगतिकता; मोदींच्या कानउघाडणीनंतर अर्थविश्वात खळबळ

VIDEO: ऑनलाइन रिटर्नच्या नावाखाली मोठा घोटाळा? 550 बॉक्स उघडताच व्यापाऱ्याला धक्का, नव्या शूजऐवजी मिळाले जुने आणि फाटलेले बूट!

Shri Rudreshwar Devasthan Election: श्री रुद्रेश्वर देवस्थान निवडणूक, अध्यक्षपदी यशवंत माडकर बिनविरोध; सातही पदांवर समर्थकांचा दणदणीत विजय

Bisleri FSSAI Action: बिसलेरीचं पाणी असुरक्षित? 'FSSAI'कडून कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईस मंजुरी; नेमकं प्रकरण काय? वाचा

SCROLL FOR NEXT