Pakistani Drone Dainik Gomantak
देश

Pakistani Drone: बीएसएफ जवानांची मोठी कारवाई; अमृतसरमध्ये पाच किलो हेरॉईन जप्त

पुन्हा एकदा बीएसएफच्या जवानांनी अमृतसरजवळ पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहे.

Puja Bonkile

Pakistani Drone: बीएसएफच्या जवानांनी अमृतसरजवळ पाकिस्तानचे ड्रोन पाडले आहे. अमृतसर जिल्ह्यातील राय गावाजवळ केलेल्या झडतीदरम्यान या क्रॅश झालेल्या ड्रोनमधून संशयित हेरॉईनचे 1 मोठे पॅकेट सापडले आहे. ज्याचे एकूण वजन अंदाजे 5.5 किलो होते. 

बीएसएफच्या जवानांनी ड्रोनचा आवाज ऐकला आणि आवाजाला लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. संपूर्ण परिसराला वेढा घातला. दरम्यान, पंजाब पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान त्यांना खराब झालेले ड्रोन तेथे पडलेले दिसले. झडतीदरम्यान गावात हेरॉईनही सापडले आहे. 

बुधवारी रात्री अमृतसरमध्येही सीमा सुरक्षा दलाने भैनी राजपुता गावात पाकिस्तानच्या दिशेने उड्डाण करणारे ड्रोन पाडले होते. सीमा सुरक्षा दलाचे जवान बुधवारी रात्री गस्त घालत असताना रात्री 9:10 च्या सुमारास त्यांना ड्रोनचा आवाज आला. 

जवानांनी आवाजाला लक्ष्य करत गोळीबार सुरू केला आणि संपूर्ण परिसराला वेढा घातला. ड्रोन मॉडेल DJI Matris 300RTK मालिका क्वाडकोप्टर होते. मात्र, ड्रोनमध्ये हेरॉईन किंवा इतर कोणतेही अवैध पदार्थ सापडले नाहीत. मात्र, या फ्रोनने हेरॉईनचे पाकीट जवळच्या गावात टाकले. ज्यामध्ये अडीच किलो हेरॉईन सापडले. आणि पोलिसांनी हे पाकीट जप्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT