murder case Dainik Gomantak
देश

बिहारमध्ये भाजप माजी आमदाराच्या भावांची गोळ्या झाडून हत्या

या आधीही दोन्ही बाजूंनी झाले आहेत अनेक खून

दैनिक गोमन्तक

बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपाचे माजी आमदाराच्या दोन सख्ख्या भावांचा दुचाकीवरून जात असताना पाठलाग करुन अज्ञातांनी पत्रकार चौकात दोघांवर गोळ्या झाडत निघृण हत्या केल्याचीबाब समोर आली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात चित्तरंजन शर्मा यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आणि आज पुन्हा दोन भावांची हत्या करण्यात आली आहे. (brothers of former BJP MLA shot dead in Bihar )

चित्तरंजन शर्मा यांचे सख्खे भाऊ शंभू शर्मा आणि गौतम शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करणाऱ्या गुन्हेगारांनी पत्रकार चौकात त्यांना ओव्हरटेक केले आणि दोघांवर गोळ्या झाडल्या. चित्तरंजन शर्मा हे धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीमा गावचे रहिवासी आहेत. गोळीबार झालेल्या दोघांपैकी एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करत होता आणि दुसरा वेब पोर्टलवर पत्रकार म्हणून काम करत होता.

या घटनेमागे जुने वैमनस्य असल्याचे सांगितले जात असून यासाठी नीमा गावातील पांडव सेनेचे प्रमुख संजय सिंह यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या हत्येचा आरोपही संजय सिंगवर होता. चित्तरंजन शर्मा आणि संजय सिंह यांच्यात जुने वैर आहे.नीमा गावात दोन गटांमध्ये तणाव आहे. यापूर्वीही दोन्ही बाजूंनी अनेक हत्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप लेखी अर्ज न दिल्याने या घटनेत नीमा गावातील पांडव टोळीचा हात आहे की नाही हे सांगणे योग्य नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT