Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: स्टंट करुन इम्प्रेस करायला गेला, पण तिनचं केला पोपट! पठ्ठ्याचा 'हा' मजेदार व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून लोटपोट

Funny Video Viral: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. लोक सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

Manish Jadhav

Funny Video Viral: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोट्यातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. दररोज हजारो व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट होतात, त्यापैकी काही खास व्हिडीओ लगेच व्हायरल (Viral Videos) होतात. अनेकदा गंमतीशीर, जुगाड, स्टंट (Stunts), भांडण किंवा नाट्यमय व्हिडीओ देखील व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे, ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक तरुणी बसलेली दिसते. त्यावेळी एक तरुण तिच्याजवळ येतो आणि तिला इम्प्रेस (Impress) करण्यासाठी एक 'फ्लिप' (Flip) मारतो. त्याचा स्टंट पाहून ती मुलगी त्याच्याबरोबर हात मिळवते (Handshake) आणि त्याला आपल्याजवळ बसायला सांगते. तो तरुण बसण्यासाठी जसा खाली वाकतो, त्याच क्षणी ती मुलगी चुपचाप तिथे एक पेन (Pen) ठेवते. तो तरुण ज्या वेगाने बसतो, त्याहून अधिक वेगाने तो उठून उभा राहतो, कारण पेन त्याला जोरात टोचतो. हा व्हिडीओ स्क्रिप्टेड (Scripted) असण्याची शक्यता आहे, पण तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ 'एक्स' (X) प्लॅटफॉर्मवर '@Pol_Khol82' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 65 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटीझन्सनी (Netizens) त्यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युझरने कमेंटमध्ये लिहिले, "सारी हीरोपंती निकल गई." दुसऱ्याने लिहिले, "हे त्या बिचाऱ्यासोबत खूपच चुकीचे झाले." तिसऱ्याने, "हे चुकीचे आहे, अशा प्रकारच्या हरकती करायला नको." तर, आणखी एका युझरने लिहिले, "आता आयुष्यात कधीच स्टंट दाखवणार नाही." अशी कमेंट केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT