Vegetable Seller Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: टोमॅटोला 'झेड सुरक्षा', तैनात केले 2 बाऊन्सर; बाप-लेकाला पोलिसांकडून अटक

Varanasi News: वाराणसीमध्ये टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर लावणाऱ्या दुकानाचा मालक आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

Manish Jadhav

Varanasi News: वाराणसीमध्ये टोमॅटोच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात करणाऱ्या दुकानाचा मालक आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. भाजीविक्रेता सपा कार्यकर्ता अजय यादव उर्फ ​​अजय फौजीचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी वाराणसीतील लंका पोलीस ठाण्यात तीन ज्ञात आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध 295, 153 ए, 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सरला तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत. तो दिवसही दूर नाही जेव्हा टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचेल. सध्या बाजारात टोमॅटो 160 रुपये किलोने विकले जात आहे. वाराणसीमध्ये (Varanasi) एका दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी त्याच्या दुकानासमोर दोन बाऊन्सर तैनात केले.

टोमॅटोला हात लावण्यास आणि पाहण्यास मनाई होती

त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन बाऊन्सर दुकानाबाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे. हे बाऊन्सर ग्राहकांना दुकानात पोहोचल्यावर अडवतात. टोमॅटो दुरुनही कोणी पाहू नये आणि त्याला हात लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा कडक सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

टोमॅटोवरुन मारामारी झाली, त्यामुळे बाऊन्सर तैनात केले

अजय फौजी म्हणाले होते की, टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. लोक टोमॅटो हिसकावून घेऊन जात आहेत. म्हणूनच आम्ही त्याच्या सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात केले आहेत. सध्या दुकानात टोमॅटोवरुन मारामारीच्या घटना घडत आहेत.

आमच्या ठिकाणीही टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे ग्राहक (Customer) नाराज झाले आहेत. एखाद्या दिवशी ग्राहकाने आमच्यावर हल्ला केला तर आम्हाला वाचवायला कोणीही येणार नाही. दुकानदाराने भाव वाढवल्याचे सर्वांनाच वाटते. त्यामुळे आम्ही आमच्या दुकानाबाहेर बाऊन्सर तैनात केले आहेत.

अखिलेश यादव यांनी दुकानाचा व्हिडिओ शेअर केला आहे

अजयच्या दुकानावर दोन पोस्टरही दिसत होते. या पोस्टर्सवर 'पहिले पैसे नंतर टोमॅटो आणि प्लीज टोमॅटो आणि मिरचीला हात लावू नका' असे लिहिले होते. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ शेअर करुन खिल्ली उडवली आहे. त्यांनी लिहिले की, भाजप सरकारमध्ये टोमॅटोला झेड प्लस संरक्षण मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT