Indigo Flights
Indigo Flights Dainik Gomantak
देश

IndiGo Receives Bomb Threat: चेन्नई-मुंबई इंडिगो प्लाइटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, विमानतळावर इमर्जन्सी घोषित

Manish Jadhav

IndiGo Receives Bomb Threat: चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या प्लाइटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, 6E-5314 प्लाइटच्या क्रू ला टॉयलेटमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यात प्लाइटमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिले होते. यानंतर सव्वा नऊच्या सुमारास मुंबई विमानतळावर प्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. लँडिंगनंतर प्लाइटची तपासणी करण्यात येत आहे. मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे. आठवड्याभरात प्लाइटला बॉम्बची धमकी देण्याची ही दुसरी वेळ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये एक पायलट सामानासह आपत्कालीन स्लाइडमधून विमानातून बाहेर पडताना दिसत आहे.

यापूर्वी, दिल्लीत एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. येथेही टॉयलेटमध्येच टिश्यू पेपरवर प्लाइटलमध्ये बॉम्ब असल्याचे लिहिण्यात आले आले होते. तसेच, काल (31 मे रोजी) दिल्लीहून येणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK611 ला बॉम्बची धमकी मिळाल्याने श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ उडाला होता. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) श्रीनगरला धमकीचा फोन आला होता.

28 मे रोजी इंडिगोचे विमान उडवून देण्याची धमकीही मिळाली होती

याआधी, 28 मे रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या प्लाइटलाही बॉम्बची धमकी मिळाली होती. फ्लाइट 6E2211 मधील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले होते. एअरलाइनने सांगितले होते की, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

New Criminal Laws: नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गोव्यात दोन गुन्हे दाखल; पहिली FIR काय?

Colva News: कोलवा पोलिसांचा स्पेशल ड्राइव्ह; ७ व्यक्तींना अटक

Parliament Session 2024: ''संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे...''; राहुल गांधींच्या भाषणावर PM मोदींचे चोख प्रत्युत्तर

Goa : बीचवरच अवघ्या दीड हजारात 'ओपन एअर मसाज', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना आली जाग

Goa Crime: ट्रॉलर ऑपरेटरच्या खूनप्रकरणी इस्राएलचा जामीन पुन्हा नामंजूर

SCROLL FOR NEXT