Students
Students Dainik Gomantak
देश

CBSE बोर्डाचा निकाल कधी होणार जाहीर, जाणून घ्या अपडेट्स

दैनिक गोमन्तक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच 10 वी आणि 12वीचे निकाल जाहीर करु शकते. CBSE बोर्डाचा निकाल 2022 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर घोषित केला जाईल. निकालाच्या प्रकाशनानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाइटद्वारे त्यांचे निकाल तपासू शकतील. (board result 2022 date time know cbse 10th 12th result declared check latest updates)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE 10 वी निकाल 2022 (CBSE बोर्ड 10वी निकाल 2022) 15 जुलै 2022 पर्यंत आणि CBSE 12वी निकाल 2022 (CBSE बोर्ड 12वी निकाल 2022) चे निकाल 31 जुलै 2022 पर्यंत जाहीर केले जाऊ शकतात. मात्र, अद्याप यासंदर्भात सीबीएसईकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, या वर्षी सीबीएसईने 10वी आणि 12वीची परीक्षा दोन टर्ममध्ये घेतली होती. टर्म 1 च्या परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आल्या. त्याच वेळी, 10वी टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल 2022 ते 24 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. 12वी टर्म 2 ची परीक्षा 26 एप्रिल ते 15 जून 2022 या कालावधीत घेण्यात आली.

जाणून घ्या कशापध्दतीने पाहू शकता निकाल

  • स्टेप 1- पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी (Students) अधिकारिक वेबसाइट cbse.gov.in वर जा.

  • स्टेप 2- त्यानंतर रिजल्ट सेक्शनवर क्लिक करा.

  • स्टेप 3. इथे CBSE बोर्ड 10वी निकाल 2022 / CBSE बोर्ड 12वी निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा.

  • स्टेप 4. आता रोल नंबर इत्यादी टाकून सबमिट करा.

  • स्टेप 5. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

  • स्टेप 6. आता तपासा आणि प्रिंट आउट घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Live News: मतदानाचा उच्चांक भाजपला घरी पाठविण्यासाठी!

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT