कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.  Dainik Gomantak
देश

भाजपचा नवा फॉर्मुला, कर्नाटकात 3 किंवा 5 उपमुख्यमंत्री?

मुख्यमंत्री पदानंतर या राज्यात तब्बल 5 उपमुख्यमंत्री (5 Deputy Chief Ministers) करण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे.राज्यात 3 उपमुख्यमंत्री (3 Deputy Chief Ministers) करण्यावर देखील एकमत झाले आहे.

दैनिक गोमन्तक

बंगळूर: कर्नाटकमध्ये (Karnataka) 2023 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी भाजपने (BJP) आतापासूनच सुरु केलेली दिसत आहे. बी.एस. येडियुरप्पा (B.S. Yeddyurappa) यांच्याकडून राजीनामा घेतल्यानंतर भाजपने कर्नाटकात मुख्यमंत्री पदाची माळ बोम्मई बसवराज (Bommai Basavaraj) यांच्या गळ्यात घातली आहे. या राज्यातील प्रत्येक मतदार आपल्या बाजूने करण्याचा भाजपचा यामागे उद्देश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री पदानंतर या राज्यात आता भाजप नवा फॉर्मुला (BJP's new formula) अमंलात आणण्याची शक्यता आहे. कर्नाटकात तब्बल 5 उपमुख्यमंत्री (5 Deputy Chief Ministers in Karnataka) करण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण जो माझ्यावर विश्वास दाखविला आहे. तो योग्य ठरवत मी चांगले प्रशासन देण्याचा प्रयत्न करेन. बसवराज यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची देखील भेट घेतली. यावेळी कर्नाटकात उपमुख्यमंत्री पदासाठी आर. अशोक, गोविंद करजोल, आणि श्रीरामलू यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तसेच राज्यात 3 उपमुख्यमंत्री (3 Deputy CM) करण्यावर देखील एकमत झाले आहे.

नवीन मंत्रीमंडळासाठी कर्नाटकात भाजपने 5 सूत्री नियमावली तयार केली आहे. त्यानुसार मंत्रीमंडळात मंत्र्यांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. नवीन मंत्रीमंडळात स्थान मिळण्यासाठी कर्नाटकात इच्छुकांची जोरदार चढाओढ पहावयास मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री बसवराज यांची परीक्षा असेल. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाच्या निर्मितीसाठी 8+7+7+7+4 = 33 हा फॉर्मुला अंमलात येण्याची शक्यता आहे.

यात लिंगायतांना 8, मागासवर्गीयांना 7, वक्कलिगांना 7, दलितांसाठी 7, आणि जैन देवांगयांच्यासह इतरांना 4 जागा देण्याचा विचार करण्यात येत आहे. यानुसार मुख्यमंत्री एक यादी करुन दिल्लीत पाठविणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करुननंतर पुन्हा दिल्लीत जातील. त्यानंतर या यादीवर शिक्का मोर्तब केला जाईल. यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PAK Fan Controversy Statement: पाकिस्तानचा 'सनकी' चाहता! हारिस रौफला भेटला अन् म्हणाला, "बदला लेना, इंडिया को छोड़ना नहीं..." Watch Video

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला लुबाडले

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

SCROLL FOR NEXT