Devendra Fadnavis Dainik Gomantak
देश

विजय म्हणजे जास्त जबाबदारी, आगामी सर्व निवडणुका भाजपच जिंकणार : फडणवीस

गोव्याच्या विजयानंतर आता भाजपचं कर्नाटक विधानसभा निवडणुकांकडे लक्ष

दैनिक गोमन्तक

पणजी : भाजपने गोव्यात अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली आहे. 20 जागांवर विजयी झालेल्या भाजपला 3 अपक्षांसह मगोपनेही पाठिंबा दिल्याने भाजपचं संख्याबळ 25 वर पोहोचलं आहे. त्यामुळे भाजपने गोव्यासह सर्व पाचही राज्यांमध्ये विजयोत्सव सुरु केला आहे. अशातच आगामी सर्व निवडणुका भाजपच जिंकेल असा विश्वास भाजपचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यासह पाच विधानसभांनंतर आता भाजपने (BJP) आपला मोर्चा कर्नाटककडे वळवल्याचं चित्र आहे. आमच्यासाठी विजय म्हणजे जास्त जबाबदारी आहे, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं आहे. त्यामुळे आता गोवा जिंकल्यानंतर फडणवीस कर्नाटककडे आपला मोर्चा वळवण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजप लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. अपक्ष आणि मगोपच्या साथीने स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करणार असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान देशात विश्वासार्हतेची मालिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केल्यामुळे पाचही राज्यांमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आमचे 21 आमदार निवडून आले तरी आम्ही अपक्षांना सोबत घेऊ असं आम्ही म्हटलं होतं. तसंच मगोपनेही (MGP) आम्हाला समर्थनपत्र दिलं आहे. त्यामुळे 25 आमदारांच्या संख्याबळाने आम्ही स्थीर आणि भक्कम सरकार बनवू असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. काँग्रेसने कालच राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र काँग्रेसचं (Congress) कुणीही आज राज्यपालांच्या भेटीला जाऊ शकलं नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT