Nupur Sharma  ANI
देश

भाजपचा मोठा निर्णय, नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल निलंबित

नुपूर यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने यापूर्वी एक निवेदन जारी करण्यात आले

दैनिक गोमन्तक

भाजपने रविवारी प्रवक्ते नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले. नुपूर यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने यापूर्वी एक निवेदन जारी करण्यात आले होते. पक्षाने नुपूर शर्मा यांचे थेट नाव न घेता म्हटले की ते सर्व धर्मांचा आदर करते आणि कोणत्याही धर्माच्या किंवा धार्मिक व्यक्तीच्या अपमानाचा तीव्र निषेध करते, असे सांगितले होते. भाजपने या दोन्ही प्रवक्त्यांना 6 वर्षासाठी निलंबित केले.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलवर लाईव्ह डिबेट दरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून अनेक मुस्लिम संघटना त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर कानपूरमध्ये हिंसाचार उसळला आणि जमावाने दगडफेक केली तेव्हा भाजपचे हा निर्णय घेतला आहे.

अरुण सिंह म्हणाले की, पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात आहे. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाच्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. भाजप अशा लोकांना किंवा विचारांना प्रोत्साहन देत नाही.

भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्माचा विकास आणि भरभराट झाली आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा कोणताही धर्म पाळण्याचा आणि प्रत्येक धर्माचा आदर करण्याचा अधिकार दिला आहे. भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना आम्ही भारताला एक महान देश बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत जिथे सर्व लोक समान आहेत. भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी आपण सर्व वचनबद्ध आहोत, असे पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MRF Recruitment Controversy: एमआरएफ नोकरभरतीत नवा ट्वीस्ट! कुडाळमधील भरती खरीच, मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी थेट पुरावाच केला सादर

Goa BJP Post: श्रीलंका, बांगलादेश, पाक & नेपाळमध्ये अस्थिरता पण मोदींच्या नेतृत्वात भारत खंबीर; गोवा भाजपची पोस्ट चर्चेत

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

World Cup 2025: 148 वर्षांत पहिल्यांदाच…! ICC ने उचलले महिलांच्या सन्मानाचे पाऊल, घेतला 'हा' मोठा निर्णय

Goa Crime: हैदराबादमधील युवकाला मैत्रीच्या बहाण्याने लुटले, पणजीतील हॉटेलात 5.7 लाखांचा गंडा; संशयितांना अटक

SCROLL FOR NEXT