Surendra Maithani Dainik Gomantak
देश

VIDEO: मतासाठी काय पण...भाजप आमदाराचा मोर्चा थेट बाथरुममध्ये !

भाजपचे आमदार सुरेंद्र मैथानी Surendra Maithani जे आता निवडणूक प्रचारासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यूपीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर रॅली आणि इतर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. हे पाहता आता लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या प्रचारासाठी घरोघरी फिरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाजपचे आमदार सुरेंद्र मैथानी (Surendra Maithani) जे आता निवडणूक प्रचारासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. नुकतेच भाजप (Bjp) आमदाराने आपल्या विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना लोकांशी संवाद साधतानाचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत. त्याचवेळी त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अंघोळ करताना दिसत आहे. मग मैथनी त्यांच्या समर्थकांसह त्याच्यापर्यंत पोहोचतात. तिथे आंघोळ करणाऱ्या मतदाराला विचारले की सगळं ठीक आहे ना? तुमचे घर यशस्वीरित्या बांधले आहे, नाही का? तुमच्याकडे रेशनकार्ड आहे का?" तिथे आंघोळ करणारी व्यक्ती फक्त होय असे उत्तर देतो.

शिवाय, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम (Instagram) पेजवर एक फोटो देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आपण गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थीच्या घरी गेलो होतो. गृहनिर्माण योजनेद्वारे स्वतःचे खाजगी घर बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कमळाचे (BJP's election symbol) बटण दाबून मला आमदार म्हणून आशीर्वाद देण्याची विनंती केली. त्यांनी मला पुन्हा आमदार होण्यासाठी आशीर्वाद दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT