viral Video  Dainik Gomantak
देश

Video: कर्नाटकच्या मंत्र्याने महिलेच्या कानशिलात लगावली, तरीही महिला मंत्र्याच्या पाया पडली

जमीनीची मालकी न मिळाल्याने महिला तक्रार करत होती

गोमन्तक डिजिटल टीम

कर्नाटकच्या गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही सोमन्ना यांनी भर कार्यक्रमात एका महिलेच्या कानशिलात लगावली. कर्नाटकातील चामराजा नगर जिल्ह्यातील हंगला गावात ही घटना घडली. या कार्यक्रमात जमिनीचे मालकी हक्क वाटप करण्यात आले, एका महिलेला ते मिळाले नाही त्यावर तीने तक्रार केली. मात्र संतापलेल्या मंत्र्यांनी महिलेच्या थेट कानशिलात लगावली. आश्चर्याची बाब म्हणजे थप्पड मारली असतानाही महिलेने मंत्र्याच्या पाया पडताना दिसली.

या कार्यक्रमासाठी सोमन्ना दुपारी 3.30 वाजता पोहोचणार होते, मात्र ते 2 तास उशिरा पोहोचले. 175 जणांना जमिनीचे मालकी हक्क दिले. ज्या महिलेला थप्पड मारली तिला जमिनीचा मालकी हक्क न मिळाल्याने तिचा राग अनावर झाला. यावेळी मंत्री सोमन्ना यांनी महिलेला थप्पड मारली. मात्र, नंतर मंत्री महोदयांनी याबाबत माफीही मागितली.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मंत्र्यांच्या या कृतीवर अनेकांनी टीका केली आहे. तसेच हे वर्तन योग्य नसल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT