Babul Supriyo Quits Politics 
देश

केंद्रीय मंत्रीपद गेलेल्या BJP च्या 'या' नेत्याने थेट राजकारणातूनच घेतला संन्यास

दैनिक गोमन्तक

भाजप (BJP) खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकारण सोडत असल्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचा मोठा चेहरा असलेल्या सुप्रीयो यांना नुकताच केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर ते नाराज असल्याचे देखील बोलले जात होते. त्यातच त्यांनी आता आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा आपल्या फेसबुक पेजद्वारे घोषणा केली. (BJP Leader and Ex-union Minister Babul Supriyo Quits Politics)

केंद्रीय मंत्रींंमंडळाचा विस्तार झाला आणि अनेक आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, रवि शंकर प्रसाद , प्रकाश जावडेकर यांच्यासह भाजपमधील बड्या नेत्यांनी राजीनामा दिला होता. यामध्ये बाबूल सुप्रियो यांचेही नाव होते. त्यानंतर बाबूल सुप्रियो यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजी देखील व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर ते तृणमुल कॉंग्रेसमध्ये जाऊ शकतात अशाही शक्यता वर्तवल्या जात होत्या त्यातच त्यांनी आता राजकार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

"गुडबाय... मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. तृणमुल कॉंग्रेस, काँग्रेस, माकप यापैकी कोणीही मला बोलावले नाही आणि मी कुठे जाणारही नाही ... सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात येण्याची गरज नाही," अशी पोस्ट करत त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता.

मंत्रीपद सोडावे लागल्यानंतर त्यांनी सोशल मिडीयावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी बाबुल सुप्रीयो यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना, “आपल्याला राजीनामा देण्यास सांगण्यात आले त्यामुळे आपण राजीनामा दिला." असे मत व्यक्त केले होते.

मात्र नंतर ती पोस्ट हटवल्यानंतर बाबुल यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर करत लिहिले की, "कुठेतरी आग लागली तरच धूर येतो. आज मी माझ्या माध्यमांमधील मित्रांचे फोन सुद्धा घेऊ शकलो नाही. विचार केला की, स्वतःच हे जाहीर कराव कि मी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे ... (मी पूर्वी सांगितले होते की मला राजीनामा देण्यास सांगितले गेले होते, मात्र हे सांगण्याचा तो योग्य मार्ग नव्हता)." सुप्रीयो यांच्या त्यावेळच्या या ट्विटमुळे मंत्रीपद गेल्याने भाजपचे अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चेला उधान आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हणजुणेत थार गाडीची दुचाकीला धडक; तिघेजण गंभीर जखमी

ISL 2024-25: आगामी लढतीसाठी FC Goa संघात होणार बदल? मार्केझ यांनी दिले संकेत

Konkan Railway: धावत्या रेल्वेतून कोसळली विद्यार्थ्यांनी, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वचावली Video

Mopa Airport: ...तर सरपंचांनी राजीनामे द्यावेत! ‘मोपा’तील नोकऱ्यांवरुन जनसंघटना आक्रमक

Mandrem: सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मांद्रेत ग्रामस्थांच्या चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT