BJP has strongly opposed Rahul Gandhi's 'Panauti' statement.
BJP has strongly opposed Rahul Gandhi's 'Panauti' statement. Dainik Gomantak
देश

Panauti: राहुल गांधींच्या 'पनौती' वक्तव्यावर भाजप संतापला, दिल्ली पोलिसांकडे केली तक्रार

Ashutosh Masgaunde

BJP has strongly opposed Rahul Gandhi's 'Panauti' statement, a complaint has been lodged with the Delhi Police and an FIR has been demanded:

भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींच्या 'पनौती' वक्तव्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून, एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

अशा शब्दांच्या वापरावर भाजपचे लोकसभा खासदार रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधींनी पंतप्रधानांची माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, "राहुल गांधी, तुम्हाला काय झाले आहे? असे शब्द तुम्ही देशाच्या पंतप्रधानांसाठी वापरत आहात. आपल्या पंतप्रधानांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना प्रेरणा दिली. जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा भाग आहे. राहुल गांधींनी माफी मागावी."

राहुल गांधींना भूतकाळातून शिकण्याचा सल्ला देत रविशंकर प्रसाद म्हणाले, 'तुम्हाला भूतकाळातून शिकण्याची गरज आहे. तुमच्या आईने नरेंद्र मोदींसाठी 'मौत का सौदागर' असा शब्द वापरला होता आणि बघा काँग्रेस आता कुठे आहे.''

दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, राजस्थानमधील निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी विश्वचषकातील भारताच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरताना 'पनौती' सारखे आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत.

राजकीय फायद्यासाठी पंतप्रधानांसारख्या घटनात्मक पदाची खिल्ली उडवणे आक्षेपार्ह असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हे वक्तव्य लोकांना पंतप्रधानांविरोधात भडकवणारे आणि अशांतता निर्माण करणारे आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम १२१, १५३ए, ५००, ५०५, ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात यावा.

काय म्हणाले राहुल?

राहुल गांधी जालोरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. ते पीएम मोदींवर टीका करत होते, त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पनौती-पनौतीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

हे ऐकून राहुल गांधींनी आपले भाषण थांबवले आणि म्हणाले की, आपली पोरं विश्वचषक जिंकू शकली असती, पण पनौतीने त्यांना हरवले. जनतेला ही पनौती कोण आहे हे माहीत आहे, पण टीव्हीवाले ते सांगणार नाहीत." यानंतर राहुल यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

पंतप्रधानांनी राहुल यांना मूर्खांचा नेता म्हटले होते

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल यांना 'मूर्खांचे सरदार' असे संबोधित केल्यानंतर राहुल यांची ही टिप्पणी आली आहे.

'मेड इन चायना फोन' या वक्तव्याबाबत मोदी कोणाचेही नाव न घेता म्हणाले होते, 'अरे 'लॉर्ड ऑफ फूल्स', तुम्ही कोणत्या जगात राहता?'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT