Akhilesh Yadav Dainik Gomantak
देश

अखिलेश यादव यांच्या विरुध्द करहलमधून केंद्रीय मंत्री बघेल निवडणुकीच्या रिंगणात

भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना करहल मतदारसंघातून अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश सारख्या लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या राज्याचाही समावेश आहे. याच पाश्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. भाजपने केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना करहल मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. (BJP fielded Union Minister SP Singh Baghel from Karhal constituency against Akhilesh Yadav)

दरम्यान, लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठ्या राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपसमोर यावेळी समाजवादी पक्षाचे कडवे आव्हान आहे. अखिलेश यांनी 22 जानेवारी रोजी मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, सपाचे सरकार आल्यास आगामी काळात 22 लाख तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगार दिला जाईल. समाजवादी नेते राम गोपाल यादव (Ram Gopal Yadav) यांनी अखिलेश यादव ‘विक्रमी’ मतांनी विजयी होतील, अशी घोषणाही केली होती.

माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखती दरम्यान अखिलेश म्हणाले की, ''मी आझमगडमधील कोणत्याही जागेवरुन निवडणूक लढवू शकलो असतो किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून जागा निवडू शकलो असतो.'' त्यांच्या पक्षाच्या पारंपारिक प्रदेशातील करहलमधून अखिलेश यादव निवडणुक लढवणार आहेत. अखिलेश पुढे म्हणाले, 'मला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुध्द निवडणूक लढवायची आहे.'

तसेच, करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पक्षाचे मोठे वर्चस्व आहे. ही जागा सपाची सुरक्षित जागा असल्याचे बोलले जात आहे. 1993 पासून सातत्याने सपा विजयी होत आहे. 2002-2007 मध्ये ही जागा भाजपने एकदाच जिंकली होती. करहल सीट मैनपुरी जिल्ह्यात येते, जो यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. करहल मतदारसंघावर गेल्या सातवेळा समाजवादी पक्षाचा वरचष्मा राहिलेला आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, सपा उमेदवार सोबरान यादव यांना या जागेवर एक लाखाहून अधिक मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी प्रेम शाक्य यांचा 38 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बहिणीच्या छातीवर बुक्की मारली, आमची लायकी काढली; मुंबईतील 13 पर्यटकांना लुथरा बंधुंच्या कल्बमध्ये मारहाण, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

अग्रलेख: ‘आत्मघाती’ पळवाटा कशा थांबवायच्या? कमी गुण मिळाल्याने मुलांनी संपवले जीवन; पालक, शिक्षक अन् समाजासाठी धोक्याची घंटा

Verna Fire: गोव्यात 'आगीचं सत्र' सुरूच! हडफडे घटनेची धग कायम असतानाच, वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण; कारण अस्पष्ट

Mapusa Accident: म्हापसात भीषण अपघात! 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Banks New Verification Rule: ऑनलाइन फ्रॉडला आता 'ब्रेक'! देशभरातील बँकांकडून पडताळणीच्या नियमांमध्ये मोठे बदल

SCROLL FOR NEXT