Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: बंगळूरुतील अजब प्रकार! भररस्त्यात गादी टाकून झोपला तरुण; वाहतूक कोंडीचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Bengaluru Viral Video: आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात जगातील कोणत्याही कोपऱ्यात घडलेली कोणतीही विचित्र घटना लगेचच आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसते.

Manish Jadhav

Bengaluru Viral Video: आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात जगातील कोणत्याही कोपऱ्यात घडलेली कोणतीही विचित्र घटना लगेचच आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसते. कोणीतरी अशा घटनांचे व्हिडिओ रेकॉर्ड करुन लगेचच सोशल मीडियावर पोस्ट करत असल्यामुळे ते क्षणात व्हायरल होतात. कधी डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी स्टंटचा. कधी दिल्लीतील व्हिडिओ चर्चेत असतो, तर कधी मुंबई किंवा बंगळूरुतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, या व्हिडिओमध्ये काही विशेष नसले तरी, जे काही घडले आहे ते खूपच थक्क करणारे आहे. बंगळूरु शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावर एक तरुण चक्क मॅट्रेस (गादी) टाकून त्यावर झोपलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो आपल्या घरात किंवा उद्यानात झोपलेला नसून भररस्त्याच्या मधोमध झोपलेला आहे. त्याच्या या विचित्र कृत्यामुळे रस्त्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसलं?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) एक तरुण मॅट्रेसवर शांतपणे झोपलेला दिसतो, तर त्याच्या आजूबाजूला अनेक गाड्या थांबलेल्या आहेत. तो झोपलेला असल्याने इतर लोकांना पुढे जाण्यासाठी वाटच मिळत नाही. हा माणूस नशेत आहे की, त्याची मानसिक स्थिती ठीक नाही, हे समजू शकलेले नाही, पण त्याचे हे कृत्य अत्यंत विचित्र आणि धोकादायक आहे. व्हिडिओमध्ये वरच्या बाजूला 'बेंगलुरु नेक्स्ट लेवल गँग है' असे लिहिलेले आहे. या कॅप्शनवरुन असे वाटते की, बंगळूरुतील तरुणाईमध्ये अशा प्रकारचे 'अजब-गजब' कृत्य करणे एक नवीन ट्रेंड बनले आहे.

सोशल मीडियावर तूफान चर्चा

हा व्हिडिओ 'एक्स' प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिण्यापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर आणि आश्चर्यचकित करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरने कमेंट केली की, "नेहमी बंगळूरुमध्येच असे प्रकार का घडतात?" दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, "अरे देवा, हा वेडा झाला आहे की काय?" आणखी एका यूजरने लिहिले की, "तिथे खूप विचित्र लोक आहेत." तर, दुसऱ्या एका यूजरने "व्हायरस आता बंगळूरुमध्ये पोहोचला आहे," असे लिहिले.

त्याचवेळी, या घटनेने केवळ बंगळूरुतीलच नव्हे, तर देशभरातील लोकांचे लक्ष वेधले आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अशाप्रकारच्या विचित्र घटनांमुळे बंगळूरु शहराच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे बंगळूरुला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते, पण दुसरीकडे अशा घटनांमुळे शहराच्या सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

दरम्यान, ही घटना केवळ एक मनोरंजक व्हिडिओ नसून एका मोठ्या सामाजिक समस्येचे प्रतिबिंब आहे. काहीवेळा लोक प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची धोकादायक कृत्ये करतात, तर काही प्रकरणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे असे वर्तन दिसून येते. या व्हिडिओने मनोरंजनासोबतच एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

SCROLL FOR NEXT